जागृत युवा : मंगेश भोयर यांनी 5 कुपोषित बालकांना दत्तक घेऊन दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जागृत युवा : मंगेश भोयर यांनी 5 कुपोषित बालकांना दत्तक घेऊन दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके :राजुरा):

राजुरा पंचायत समिती अंतर्गत पेल्लोरा येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या 5 कुपोषित बालकांना येथील युवा काँग्रेस चे सक्रिय कार्यकर्ते मंगेश वारलू भोयर यांनी दत्तक घेत त्यांच्या पोषणहारची जबाबदारी स्वीकारली.


अप्लभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांच्या या मुलांना आता सकस आहाराच्या माध्यमातून कुपोषण मुक्त करण्याचा विडा उचलत याकरिता लागणाऱ्या सर्व पोषक साहित्यांचा व आहाराचा खर्च ते स्वतः उचलणार आहेत. या अनुषंगाने पेल्लोरा येथील अंगणवाडीला भेट देऊन केली व अंडी उपलब्ध करून दिल्या. 

या प्रसंगी माजी सरपंच विनोद झाडे, संतोष तुराणकर, ज्ञानेश्वर डोहे, किशोर डोहे, नंदकिशोर अडबाले, दिनकर आत्राम, सुरेश भोयर, राकेश वदरे, गोपाळ बोढे, गणेश आत्राम, ग्राम पंचायत सदस्य अरुण झाडे आणि गावातील मान्यवरांची उपस्थित होती. मंगेश भोयर यांच्या या सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.