30व्या रस्ते सुरक्षा अभियानचे चंद्रपूर येथे उदघाट्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

30व्या रस्ते सुरक्षा अभियानचे चंद्रपूर येथे उदघाट्न

Share This
-7887891038 या क्रमांकावर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडे नोंदवा तक्रार.
खबरकट्टा / चंद्रपूर :
आज दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी तिसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाचे माननीय नामदार श्री हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. 

सकाळी नऊ वाजता जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथील परेड ग्राउंडवर आर एस पी च्या विद्यार्थ्यांचे जनजागृती परेड संचालन ठेवण्यात आली होती.

रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री माननीय नामदार श्री हंसराज अहिर यांना मानवंदना देऊन परेडचे संचालन करण्यात आले. परेड मध्ये एकूण अकरा शाळांनी सहभाग घेतला होता. परेडनंतर जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालय ते सावरकर चौक ते बसस्थानक चौक ते परत पोलीस मुख्यालय पर्यंत जनजागरण जनजागरण रॅली काढण्यात आली. वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन माननीय नामदार श्री हंसराज अहिर यांनी केले. 

त्यानंतर पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले व पोलीस कर्मचाऱ्यांना कॅप व मास्क चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत नागरिकांना तक्रार नोंदवता याव्यात याकरिता माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून एक व्हाट्सअप क्रमांक असलेला मोबाईल क्रमांक. 7887891038 पोलीस निरीक्षक श्री जयवंत चव्हाण यांना सोपवण्यात आला. 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर यांच्या रस्ता सुरक्षा नियमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री मारुती इंगवले, पोलीस उपाधीक्षक मुख्यालय, श्री शांताराम फासे, उपविभाग रस्ते व परिवहन अधिकारी , श्री पाटील विभाग नियंत्रण एसटी महामंडळ, श्रीमती जेके मेश्राम समादेशीका आर एस पी, हे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विश्वंभर शिंदे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांनी केले.