आजचे राशीभविष्य :28 फेब्रुवारी 2019 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजचे राशीभविष्य :28 फेब्रुवारी 2019

Share This
खबरकट्टा /आजचे राशीभविष्य : 28 फेब्रुवारी 2019


♈मेषः
आपल्याला आज दिवसभर अस्वस्थ वाटून चीडचीड होईल. रागावण नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी आणि घरात वादाचे प्रसंग टाळा. धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल.

♉वृषभः
अपचनाचा त्रास संभवतो. दिवसभर मन बेचैन राहील. शक्यतो प्रवास टाळा. आपली कामे वेळच्यावेळीच करा. योग, ध्यान आणि आध्यात्मिक पठनामुळे मनःशांती मिळेल.

♊मिथुनः
आपला दिवस मौजमजेत जाईल. आप्तेष्टांसह फिरण्याचा योग येईल. सार्वजनिक आयुष्यात मान, सन्मान मिळेल. दान, धर्माची कार्ये करण्याचा योग संभवतो.

♋कर्कः
आपला आजचा दिवस आनंदात जाईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण शांत असेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. खर्चात वाढ होईल.

♌सिंहः
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. सृजनात्मक निर्मिती हातून घडेल. साहित्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तिंसाठी आजचा दिवस फलदायी आहे. प्रेमळ व्यक्तीचा सहवास लाभेल.

♍कन्याः
आपल्याला आज दिवसभरात प्रतिकुलतेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनावरील ताणामुळे बेचैन वाटेल. घरात वादविवाद होतील. मालमत्तेशी निगडीत समस्या उद्भवतील.

♎तुळः
आजचा आपला दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. चांगली बातमी मिळेल.

♏वृश्चिकः
नकारात्मकता टाळा. कौटुंबिक वादविवाद टाळा. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.

♐धनुः
हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभाचा योग आहे. मंगलकार्यात सहकुटुंह सहभागी व्हाल. आप्तेष्टांच्या भेटीने मन प्रसन्न राहील. समाजात मान मिळेल.

♑मकरः
धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. धार्मिक कार्यासाठी खर्च होतील. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अतिपरिश्रम केले, तरी अपेक्षित यश मिळणे कठीण आहे. आरोग्याची काळजी घ्या.

♒कुंभः
नवी कार्ये हाती घ्याल. नोकरी, धंद्यात आर्थिक लाभ होतील. समाजात मान मिळेल. कुटुंबातील व्यक्तिंकडून सुख मिळेल. संपूर्ण दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल.

♓मीनः
आपल्यासाठी आजचा दिवस फलदायी ठरेल. कामातील यश आणि अधिकारी वर्गाकडून मिळालेले प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करतील. व्यापारी वर्गाच्या मिळकतीत वाढ होईल. देणी चुकती कराल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील