जेव्हा 21 वर्षानंतर हरविलेले बाबा घरी येतात : चंद्रपूर जिल्ह्यातील आश्चर्यचकित करणारी घटना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जेव्हा 21 वर्षानंतर हरविलेले बाबा घरी येतात : चंद्रपूर जिल्ह्यातील आश्चर्यचकित करणारी घटना

Share This
- बेपत्ता वनरक्षकाला शोधण्यात चंद्रपूर पोलिसांना सुयश 
खबरकट्टा / चंद्रपूर :


पश्चिम बंगाल मधील गंगासागर मेळावा कुणाला काय देतो काय माहिती ? पण महाराष्ट्रातील एका कुंटुंबाला मात्र एक सुखद धक्का घडवणारा नक्कीच ठरला आहे. अंदाजे 21 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले राजाराम बोनगीरवार आपल्या कुटुंबाला सापडलेले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके कोठारी पोलीस स्टे. चंद्रपूर पोलीस' तहसीलदार विकास अहिर ' बंगाल रेडिओ ऑपरेट निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर अहमदनगर ह्यांनी राजाराम बोनगीरवार आपल्या कुटुंबाला सापडण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न केले. 
सागर जिल्ह्यातील ( प. बं. ) वेस्ट बंगाल रेडिओ  क्लब च्या सदस्यांमुळे हे शक्य झाले. थोडक्यात हकीकत अशी ' गंगासागर मेला जगप्रसिध्द असून लाखो भाविक येथे स्नानानाकरिता येतात. याठिकाणी होणाऱ्या मोठ्या गर्दीमुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रशासन सज्ज असते. याही पलीकडे जाऊन वेस्ट बंगाल रेडिओ क्लबचे अम्बरीश बिस्वास हे या मेळाव्यात स्वयंसेवक म्हणून काम करीत असता राजाराम बोणगीरवार विमनस्क आणि आजारी अवस्थेत त्यांचे चमुला सापडले. वेस्ट बंगाल रेडिओ क्लबच्या सदस्यांनी त्यांना ताबडतोब वैद्यकिय सेवा पुरवून चौकशी केली. चौकशीत राजाराम  हे महाराष्ट्रातील आहेत असे समजले. तसेच त्यांनी आपल्या गावाचे नाव कोठारी असे सांगितले. अशी फिरली चक्रे : 


मा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तिचा शोध घेणेबाबत शोध मोहिम राबविली होती.मा पोलीस अधीक्षक, एसडीपीओ देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात पथक काम करत होते.त्यांना बंगाल रेडिओ क्लबचे बिस्वास आणि महाराष्ट्रातील एक निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर यांनी  कोठारी  पोलीस स्टेशनचे ठानेदार  सहायक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्याशी संवाद साधून माहिती दिली. त्याना कोठारी येथून राजाराम बेपत्ता असल्याची महिती मिळाली. कोलकात्याहून छायाचित्र पाठविण्यात आले. परंतु कुटूंबीयांनी ओळखले नाही. राजाराम वनविभागात कार्यान्वित होते.


त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात 2002 मध्ये नोंद केल्याचे आढळले . त्यामध्ये राजाराम यांचे वर्णनाची नोंद आहे  शरीरावरील खुणांची माहिती ठानेदार यांनी बिस्वास यांना दिल्यावर ते इसम बोनगिरवार असल्याची  खात्री पटली. तहसीलदार बल्लारपूर यांनीही यात मदत केली.राजाराम यांचा शोध घेण्याकरिता त्यांच्या मुलासह ठाणेदार अंबिके यांनी पोलिस हवालदार पुलगमकर, पोलिस शिपाई विनोद, सचिन पवार यांना कोलकत्ता येथे रवाना केले. तेथे काकद्वीप रुग्णालयात त्यांची भेट झाली. तब्बल 21 वर्षांनी मुलांना वडील मिळाले. हे काम वेस्ट बंगाल रेडिओ क्लब च्या सदस्यांमुळे शक्य झाले. 
तब्बल 21 वर्ष बेपत्ता असलेले वनरक्षक राजाराम बोनगीरवार हे कोठारी तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील मुळ रहिवासी असल्याने पोलीस स्टेशन कोठारी तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर चे सहायक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके ह्यांनी 21 वर्षापासून दूर असलेल्या परिवाराला जवळ करण्याचे काम केल्याने कोठारी परिसरातच नाही तर तालुक्यात सुद्धा ह्या चर्चेला ऊत आलेले दिसून येत आहे. तर जिकडुन तिकडून पोलिसांचे परिसरात आभार व्यक्त करतांना दिसून येत आहे.बोनगिरवार परिवारात उसळले आनंदाचे वातावारण :


पोलीस स्टे. कोठारी चे ठाणेदार संतोष अंबिके सर यांच्या प्रयत्नातून जवळपास 21 वर्षापासून बेपत्ता असलेल्या आमच्या वडीलांची आम्हाला भेट करून दिली ही आमच्यासाठी अविस्मरणीय भेट असून बाबांच्या भेटीमुळे आम्हच्या परिवारात आनंदी आनंद वातावरण पसरले आहे. बाबाला आम्हच्या कुटुंबाला भेट करून देणाऱ्या सर्व पोलीस प्रशासनाचे व त्यांच्या सहकार्यांचे आम्ही बोनगिरवार परिवाराकडुन जाहीर आभार व्यक्त करतोय असे सुनील बोनगिरवर यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.संदिप गव्हारे,युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केले समाधान :आश्चर्यचकित करणारी अविश्वासनीय घटना बल्लारपूर तालुक्यातील येत असलेल्या कोठारी गावात घडली असून ह्यात 21 वर्षापासून बेपत्ता असलेले वनरक्षक राजाराम बोनगिरिवार यांची कुटुंबाला भेट करून देणारे चंद्रपुर प्रशासन व त्यांचे सहकारी हे देवदूतच ठरले आहे. पोलीस स्टे. कोठारी चे ठाणेदार संतोष अंबिके सोबतंच पोलीस प्रशासन चंद्रपुर यांनी केलेल्या महान कार्याचा परिसरातच नाही तर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. राजाराम बोनगिरिवार यांच्या भेटीमुळे परिवारात आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत असून परिसरातून पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.