205 अपंगांना उपयोगी वस्तूंच्या वाटपासह पार पडला जिव्हाळा सेवाभावी संस्थेचा द्वितीय वर्षपूर्ति सोहळा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

205 अपंगांना उपयोगी वस्तूंच्या वाटपासह पार पडला जिव्हाळा सेवाभावी संस्थेचा द्वितीय वर्षपूर्ति सोहळा

Share This
संस्थेकडून दोन वर्षात 670 रक्तदात्यांद्वारे मोफत रक्तदान व 21 अत्यंत गरीब रुग्णांना केली गेली भरीव आर्थिक मदत
खबरकट्टा / महाराष्ट्र (वर्धा / विशेष):

समाजातील अत्यंत गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत करून त्यांचा उपचार पूर्ण करने व गरजू रुग्णांना मोफत रक्तदाते पुरवठा करने हे मूळ उद्देश् घेवून निरंतर कार्य करणाऱ्या जिव्हाळा सेवाभावी संस्थेच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त हनुमान टेकडी येथे वृक्षारोपण, सेवाग्राम रुग्णालयात रक्तदान व शासकीय रुग्णालयात व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, कुबड्या, अंधकाठी व कर्णयंत्र ई. अपंग उपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. 

जिच्या प्रेरणेतून जिव्हाळा सेवाभावी संस्थेची स्थापना झाली त्या निकिताच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त व संस्थेला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संस्थेचा द्वितीय वर्षपूर्ती सोहळा दिनांक 08 फेब्रुवारी ला सायंकाळी दाते सभागृह, वर्धा येथे उत्साहात पार पडला.


 गुरुदेव सेवा मंडळ, आर्वी नाका वर्धा यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर मान्यवारांच्या हस्ते निकिताच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमाला सुरवात केली गेली. प्रास्थाविकपर भाषणात संस्थेच्या सचिवांनी संस्थेकडून मागील दोन वर्षात राबविल्या गेलेल्या विविध समाजउपयोगी उपक्रमांची माहिती देतांना सांगितले की, जिव्हाळा परिवारकडून 21 अत्यंत गरजू रुग्णांना भरीव आर्थिक मदत करुन त्यांचे उपचार पूर्ण केले गेले आणि गरीब व गरजू रुग्णांना 670 रक्तदात्यांद्वारे ऑन कॉल सावंगी, सेवाग्राम व सरकारी रुग्णालय येथे मोफत रक्तदान केले गेले. 

यासोबतच कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच झोपणाऱ्या 48 गरजू लोकांना ब्लैंकेट वाटप, मतिमंद व अनाथांना स्वेटर वाटप, शासकीय रुग्णालयाच्या मदतीने संस्थेतर्फे आतापर्यंत एकूण 233 अपंगांना व्हीलचेअर तीनचाकी सायकल अंधकाठी कर्णयंत्र व कुबड्या ई. चे वाटप, गरजवंताना रेशन वाटप, अनाथालयात अन्नदान व आर्थिक मदत, लग्नमंडपी रक्तदान, नववर्षाची सुरवात रक्तदानाने, वृक्षलागवड व संवर्धन असे अनेक समाजूपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी आसमंत स्नेहालय वर्धा च्या टीमचा, जिल्हा अन्नदान समिती वर्धा व जिव्हाळा मित्र मंडळ अकोला या संस्थांचा सामाजिक कार्यातील मोठ्या सहभागासाठी सत्कार करण्यात आला. यासोबतच प्रसारमाध्यमांच्या जबाबदार प्रतिनिधींचा देखील याप्रसंगी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री संत सयाजी महाराज, अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी, तर प्रमुख अतिथि म्हणून सेवाग्राम मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉ नितीन गंगणे व गुरुदेव सेवा मंडळाचे श्री वागदरकर दादा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांतभाऊ भोसले तर आभार प्रदर्शन सौ ऋतुजा मोरणकर यांनी केले.