राजुरा येथे जिल्हा स्तरीय मॅरेथॉन तरंग 2019 रन फॉर वॉटर आयोजित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथे जिल्हा स्तरीय मॅरेथॉन तरंग 2019 रन फॉर वॉटर आयोजित

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा):
शिव जयंती क्रीडा महोत्सव समिती राजुरा, चंद्रपूर जिल्हा अॅथलेटिक्स  संघटना , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व राजुरा तालुका अॅथलेटिक्स संघटना यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित पाणी वाचवा सृष्टी वाचवाया सामाजिक संकल्पनेतून भव्य जिल्हा स्तरीय मॅरेथॉन मॅरेथॉन तरंग 2019 रन फॉर वॉटर दि 19 फेब्रुवारी 2019 ला सकाळी 6 वाजता  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पंचायत समिती चौक राजुरा येथे घेण्यात येत आहे.

सदर स्पर्धेत दोन गटात घेण्यात येणार असून 17 वर्ष आतील मुले व मुली ज्यांचा जन्म 1/1/2001 नंतर असावा तसेच मुक्त गट 17 वर्ष वरील मुले व मुली असा राहील. 

विजयी खेळाडूस रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केल्या जाईल व सहभागी खेळाडूस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

मॅरेथॉन मध्ये नाममात्र प्रवेश शुल्का सह जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा असे आवाहन आयोजन समितीने केलेले आहे. प्रवेशा साठी श्री विरुटकार -8830447501, श्री चिंचोलकर -9881924325, कु पुर्वा खेरकर - 9552486804 यांचेशी संपर्क करावा