1950 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा, मतदार यादी तील आपले नाव तपासा : डॉ कुणाल खेमणार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

1950 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा, मतदार यादी तील आपले नाव तपासा : डॉ कुणाल खेमणार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

आगामी  निवडणुका लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातील  नवमतदारांना व अन्य मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहेत अथवा नाहीत. यासाठी निवडणुक आयोगाने हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. 

टोल फ्री क्रमांक 1950 वर संपर्क साधून याबाबत कोणत्याही मतदाराला खात्री करता येते. 

चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांनी 1950 वर संपर्क करुन आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. 

देशात व राज्यात या वर्षात निवडणुका होत असून या निवडणुकीत मतदानापासून कुणीही वंचित राहू नये व अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केलेल्या या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज केले आहे. नवमतदारांनी नाव नोंदणी केली नसेल तर नाव नोंदणीसाठी जेष्ठांनी त्यांना प्रोत्साहीत करावे.

जिल्हयातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावणे, जसे राष्ट्रीय कर्तव्य आहे. तसेच आपण मतदार यादीत आहे अथवा नाही याबाबतही तपासणी करणे महत्वाचे ठरते. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या निवडणुकीमध्ये ईव्हीएम सोबतच व्हीपॅड मशीन वापरली जात आहे. व्हीपॅडमुळे आपले मत आपण कोणाला देतो आहे हे माहिती पडणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया 100% पारदर्शी असल्याचेही त्यांनी सांगितले