आजपासून चंद्रपुरात 19 वे पक्षीमित्र संमेलन :अनेक पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक करणार मार्गदर्शन. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजपासून चंद्रपुरात 19 वे पक्षीमित्र संमेलन :अनेक पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक करणार मार्गदर्शन.

Share This
-संमेलजिल्ह्यातील माळढोक व सारस पक्षी संरक्षण व अधिवासाच्या दृष्टीने ठरणार महत्व्हाचे.
खबरकट्टा / चंद्रपूर :

19वे पक्षीमित्र संमेलन आज दिनांक9 ते उद्या 10 फेब्रुवारी 2019 ला इको- प्रो संस्थेतर्फे चंद्रपूर येथे पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.


या संमेलनाचे उदघाटन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) श्री नितीन काकोडकर करणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पक्षी अभ्यासक श्री गोपाल ठोसर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षीमित्र, श्री दिलीप विरखडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक श्री एन आर प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार, स्वागताध्यक्ष डॉ अशोक जिवतोडे, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री मनोहर पाऊनकर, व ग्रीन प्लॅनेट चे अध्यक्ष श्री सुरेश चोपणे राहणार आहेत.

संमेलनास विदर्भातील 160 पक्षीमित्रांनी नोंद केली असून, विविध अभ्यासक व मार्गदर्शक उपस्थित होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनास जिल्ह्यातील पक्षी अधिवास संरक्षण, विदर्भातील माळराने, पक्षी संरक्षण व संवर्धन, शहरी पक्षी अधिवास व सध्यस्थिती व आव्हाने या विषयावर चर्चा सत्र आयोजित केले आहे. तसेच या संमेलनाकडे जिल्ह्यातील माळढोक व सारस पक्षी संरक्षण व अधिवासाच्या दृष्टोने महत्व्हाचे समजले जात आहे.