ब्रेकिंग :जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हमला : सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 39 जवान शहीद - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग :जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हमला : सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 39 जवान शहीद

Share This
खबरकट्टा / राष्ट्रीय बातमी :
श्रीनगर- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या दोन बसेसला दहशतवाद्यांनी गुरुवारी दुपारी टार्गेट केले. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले असून 20 हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.

     
पुलवामामधील अवंतीपुरात सीआरपीएफच्या बसला दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या कारची धडक दिली. स्फोट होताच दुसर्‍या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले आहेत. 
     
जैश-ए-मोहम्मदचा प्रवक्ता मुहम्मद हसन याने एका लोकल मीडियाशी बोलताना सांगितले की, सीआरपीएफच्या ताफ्यातील दोन बसेसला आम्ही टार्गेट केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी आमच्या संघटनेने स्विकारली आहे. आदिल अहमद ऊर्फ वकास कमांडोने हा हल्ला घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे. आदिल अहमद हा 2016 नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता.

    
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येतात त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.सीआरपीएफच्या माहितीनुसार, रस्त्यावर एका चारचाकी गाडीमध्ये  बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधली बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबारही करण्यात आला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले असून, 20 हून अधिक जवान जखमी आहेत.