आजचे राशीभविष्य : 14 फेब्रुवारी 2019 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजचे राशीभविष्य : 14 फेब्रुवारी 2019

Share This

खबरकट्टाआजचे राशीभविष्य : 14 फेब्रुवारी 2019

मेष :


आपणास उत्तम सहाय्य मिळू शकेल. आपण मदत केलेल्या व्यक्ती आपणास उपयोगी पडतील अशा भ्रमात राहू नका. ग्रहमान आपणास बरेचसे अनुकूल असणार आहे. मात्र आपल्या प्रकृतीस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, ही महत्त्वाची बाब आहे. कामकाजात आपण गुंतून राहणे हेच योग्य ठरणार आहे. आर्थिक बाजू आपणास योग्य साथ देऊ शकेल. कौटुंबिक कार्यातील आपले ध्येय साध्य करणे शक्य होईल. कुठलेही कार्य विचारपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. प्रलोभने टाळा. अचानक प्रवास संभवतो.


वृषभ :आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होतील हे गृहित धरू नका. तडजोड व सामोपचाराचे धोरण स्वीकारणे आपणास लाभदायक ठरू शकते. सकारात्मक विचाराला प्रयत्नांची जोड देणे फार महत्त्वाचे असणार आहे. आपणास भागीदारी आणि कोर्टाची कामे यात दिलासा मिळेल. वैवाहिक वातावरण चांगले राहील. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. मानसिक स्थिरता राहील आणि आपसातील दुरावा कमी होईल. आपल्या अंगातील कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रकृती जपा.मिथुन :


नोकरी व्यवहारात होणाऱ्या चांगल्या बदलांचा व्यावहारिकदृष्ट्या उपयोग करण्याचा आपला मानस ठेवा. नोकरीत बढती अथवा बदलीचे योग संभवतात, त्या दृष्टीने आपली पावले टाकणे योग्य ठरेल. आगामी काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम असून त्या दृष्टीने त्याची तयारी करणे आवश्यक ठरेल. हितशत्रूंकडे सध्या लक्ष देण्याचे कारण नाही. साहित्य क्षेत्रात आपले नाव मोठे होईल. तसेच व्यासपीठ गाजविण्याची संधीही मिळेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही आपणास चांगली साथ मिळेल. मुलांचे प्रश्न सोडविता येतील. आर्थिक बाजू ठीक राहील.कर्क :फार संवेदनशीलता राहू नका. नोकरदारांना बदली अथवा बढतीच्या दिशेने पाऊल टाकणे शक्य होईल. आर्थिक व्यवहारात विशेषतः मोठ्या व्यवहारात असणाऱ्या अटींचा पूर्ण अभ्यास करूनच त्याला मान्यता द्यावी लागणार आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कौटुंबिक जीवनात काही वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता राहील, तेव्हा असे प्रश्न सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाजू ठीक राहील. जुने येणे वसूल होईल.सिंह :


आपण कितीही मोठे काम यशस्वी केले, तरी त्याची पावती मिळणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे आपल्या यशाचे कोणी कौतुकही करणे कठीण आहे. पण आपल्या कामाचे महत्त्व मात्र इतरांना कळत राहील. घरगुती प्रश्न उपस्थित होतील. त्यांना वादाचे स्वरूप न देता, सामंजस्याने ते सोडविण्याचा प्रयत्न करा. नोकरीत सुलभता जाणवेल. प्रलोभनांपासून दूर राहा. आपल्या बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. व्यापारात प्रगती करण्याची संधी मिळेल. अचानक प्रवासाचे योग संभवतात. प्रकृती जपा.कन्या :कला, साहित्य क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी प्राप्त होईल. धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल. प्रवासाचे बेत साध्य होतील. वैवाहिक जीवनात आनंदमय वातावरण राहील. कौटुंबिक क्षेत्रातही उत्तम काळ राहील. महिलांना मनाप्रमाणे खरेदी करता येईल. थोरामोठ्यांच्या भेटीचा लाभ घेता येईल. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. व्यवहारात चोखपणा ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीस्वास्थ्य जपा.तूळ :

वातावरण तापलेले राहील, वादाचे प्रसंग येतील, कौटुंबिक प्रश्न उद्‍भवतील. त्यासाठी संयम, शांतता, सामंजस्य यांचा वापर करून परिस्थिती हाताळा. नोकरी व्यवसायात अधिक लक्ष देऊन प्रगतीचा प्रयत्न करा. आर्थिक बाजू ठीक राहील. कठीण प्रसंगात आव्हानाने आपले महत्त्व व कार्य सिद्ध करण्यास विसरू नका. प्रत्येक कार्यात, व्यवहारात कायद्याचे पालन कटाक्षाने करा, त्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या.


वृश्चिक :आगामी काळात काही चांगल्या, महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे, त्यांचे पडसाद लवकरच पडू लागतील. आपणास अपरिचित असलेल्या व्यक्तींना मदत करण्याचे टाळावे. आपले कुटुंबीय सुखदुःखात आपल्या पाठीशी उभे राहतील. सध्याच्या काळात कोणालाही नाराज करण्याचे कटाक्षाने टाळावे. व्यवहारात मात्र चोखपणा ठेवा. औषधे घेताना ते योग्य आहे की नाही याचा विचार करूनच घ्यावे. प्रकृतीची पथ्ये पाळा. कलाक्षेत्राला चांगला वाव मिळेल. प्रवासाचे योग येतील. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल.धनु :


कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यात आपण यशाचे मानकरी राहाल. नोकरी व्यवसायात आपल्या मनाप्रमाणे काम पार पाडता येतील. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवल्यास आर्थिक बाजू व्यवस्थित सांभाळता येईल. विवाहइच्छुकांच्या आशा-अपेक्षा पुऱ्या होण्यास ग्रहमान साथ देईल. मात्र कायद्याची चौकट ओलांडणार नाही याची दक्षता घ्या. नको ती आव्हाने सध्या स्वीकारू नका. प्रगतीची वाटचाल करता येईल. प्रकृती जपा.मकर :आर्थिक गोष्टींत वादविवाद होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. मतभेदातील अंतर वाढणार नाही याची दक्षता घ्या. कला, साहित्य, संगीत अशा माध्यमातून आपले प्रश्न, मानसिक दडपण कमी करण्यास उपयुक्त ठरतील. खाण्यापिण्याची पथ्ये कटाक्षाने पाळा. प्रकृतीची काळजी घ्या. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची खातरजमा करा. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रवासही कराल. नवे परिचय लाभदायक ठरतील. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाजू सावरता येईल.कुंभ :

नोकरी व्यवसायात वादविवादाचे प्रसंग उद्‍भवू शकतात. अशा वेळी वादविवादापेक्षा तडजोडीचे धोरण स्वीकारणे अधिक हितकारक ठरणार आहे. कायद्याचे नियम ओलांडून नवी संकटे ओढवून घेऊ नका. नोकरदारांनी आपले प्रश्न सामंजस्य व तडजोडीने मिटविण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृतीची पथ्ये पाळा. गाठीभेटीचे योग संभवतात.


मीन :आपणास कामाचा उत्साह येईल. बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळून आपली बाजू योग्य तऱ्हेने इतरांना मांडू शकाल. बोलण्याचा प्रभाव इतरांवर पाडाल. राजकीय क्षेत्रात आपले योगदान राहील. नोकरीनिमित्त प्रवासाचे योग येतील. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा जेणेकरून पोटाच्या तक्रारी राहणार नाहीत. प्रयत्नांची जोड देऊन आपण आपले कार्य साध्य करू शकाल. सांस्कृतिक व धार्मिक कार्यात आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळू शकेल. आपला वैचारिक दृष्टिकोन बदलला तर पुष्कळशा गोष्टी साध्य करणे शक्य होईल.