आजचे राशी भविष्य 13फेब्रुवारी 2019 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजचे राशी भविष्य 13फेब्रुवारी 2019

Share This

खबरकट्टा /आजचे राशी भविष्य :

मेष

आपले कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यवसायातील लोकांच्या गाठीभेटी, सामाजिक उपक्रम, थोरामोठ्यांचे मार्गदर्शन यांचा सर्व दृष्टीने विचार केल्यास आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करून आपणास प्रयत्नांची जोड देऊन पुढे जाता येईल. आपण चांगल्या मंडळींच्या सहवासात राहा. आपला दुसऱ्याबद्दलचा गैरसमज न करता वस्तुस्थितीची पडताळणी करा. वरिष्ठांशी वादविवाद न करता सामंजस्याने वागा आणि प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. प्रकृती जपा.
वृषभ


आपणास आर्थिक, मानसिक कार्यक्षेत्रात बराचसा दिलासा मिळेल. मित्रांच्या गाठीभेटी होतील. आपल्या कार्यात नावलौकिकाची भर पडेल व चांगला प्रतिसाद मिळू लागेल. कला, साहित्य क्षेत्रांत चांगली प्रगती साधता येईल. विवाहइच्छुकांना आपल्या आकांक्षा पार पाडण्याची संधी मिळेल. कामकाजात अनुकूलता लाभेल. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. मुलांचे प्रश्न सोडविता येतील. प्रवासाचे योग संभवतात. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक जीवनात एखादी चांगली गोष्ट घडण्याची शक्यता राहील.


मिथुन


दिवस सर्व दृष्टीने अतिशय धावपळीचा जाणार आहे. कला, साहित्य, संगीत, पत्रकारिता या क्षेत्रांत प्रगतीची वाटचाल करून वेगळे बक्षिसाचे संकेत मिळू शकतील. आपल्या कामाचे योग्य मूल्यमापन केले जाईल व त्याची काहीशी बक्षिसाची पावतीपण मिळू शकेल. परदेशी शिक्षण घेण्याची संधी मिळण्याची शक्यता राहील. नोकरीत बढतीची संधी प्राप्त होण्याची शक्यता राहील. नोकरीत अनुकूलता मिळेल. विवाहइच्छुकांच्या मनोकामना पुऱ्या होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाजू सावरता येईल. त्या दृष्टीने प्रयत्नशील राहा. प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क


आपणास काही चांगल्या बदलाची शक्यता अनुभवता येईल. सामाजिक, व्यावसायिक, राजकीय क्षेत्रांत शुभ वर्तमानाचे संकेत मिळतील. बरेच न सुटलेले प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू उत्तमपणे सावरता येईल. कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी करता येईल. प्रवासाचे बेत सफल होतील. नोकरदारांना बढतीची संधी प्राप्त होईल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल.


सिंह

आपल्या प्रकृतीस्वास्थ्याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. विशेषतः खाण्यापिण्याबाबत जागरूक राहावे लागेल. आपण आर्थिक बाजू सुधारण्यासाठी अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. आपल्या कामाचे योग्य नियोजन करू शकाल. वैवाहिक जीवनात काही गैरसमज राहण्याची शक्यता आहे, तरी जपा. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याची शक्यता राहील. नको त्या प्रलोभनांना बळी पडू नका. अचानक प्रवासाचे योग येतील. घरगुती वातावरण बिघडू देऊ नका. प्रकृती जपा.


कन्या


आपण कोणासही विरोध करू नका आणि पुष्कळशा बाबतीत तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास आपण आपले कार्य साध्य करू शकाल. हितशत्रूंना खतपाणी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आर्थिक धोरण बऱ्यापैकी राबविता येईल. उद्योग व्यवसायाला चालना मिळू शकेल. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करा. कलाक्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग येतील. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. प्रकृतीची पथ्ये पाळा. नवीन वर्षाचा काळ आनंददायी ठेवता येईल.


तूळ

नको त्या प्रलोभनांना भुलू नका व सत्याचा मार्ग स्वीकारा, त्याचप्रमाणे प्रयत्नांचा पाठपुरावा करा. नोकरी व्यवसायात सहकार्याने आपली कामे पार पाडू शकाल. भागीदारीचे काम यशस्वीपणे करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा वेळीच त्यावर नियंत्रण ठेवा. नव्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळू शकेल. सर्व गोष्टींचे योग्य नियोजन केल्यास कामकाजांचा वेग वाढीला लागेल. आर्थिक बाजूही ठीक ठेवता येईल. कोर्टकचेरीच्या कामात यश संभवते. प्रकृतीची पथ्ये मात्र कटाक्षाने पाळा.
वृश्चिक


तडजोडीने आपण पुष्कळशा गोष्टी साध्य करू शकाल. नोकरी व व्यवसायात आपण अपेक्षित असे सहकार्य मिळवू शकाल. कला, साहित्य, नोकरी या क्षेत्रांत प्रगतीची वाटचाल करू शकाल. राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव राहील. मुलांकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. प्रवासाचे योग येतील. नोकरीत सुलभता जाणवेल.


धनु


राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी वेळ द्यावा लागेल. व्यवसायात नव्या योजना, नव्या दिशा या दृष्टीने पावले टाकावी लागतील. बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळेल. व्यापारात प्रगती करता येईल. आपल्या बोलण्याने इतरांना प्रभावित करू शकाल. लेखकवर्गासाठी हा काळ उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा वेळीच त्यावर नियंत्रण ठेवा. वास्तू-जागा खरेदीचे बेत साध्य होतील. वाहन खरेदीचेही योग संभवतात. वैवाहिक जीवन आनंदमय राहील. मुलांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. पथ्ये पाळा. थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. प्रवासात सावधानता बाळगा.मकर


आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रवास कराल, मात्र प्रवासात सावधानता बाळगा. प्रतिकूलतेवर मात करता येईल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी संधी मिळण्याची शक्यता राहील. कौटुंबिक जीवन चांगले ठेवता येईल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. सर्व व्यवहारात सरळ मार्ग स्वीकारा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील मार्ग सुकर ठेवता येईल.


कुंभ


आर्थिक, व्यावहारिक बाजू चांगली ठेवता येईल. शिक्षण, हॉटेल व्यवसाय, सराफी व्यवसाय या क्षेत्रांतील व्यक्तींना लाभदायक राहील. कामाचा व्याप योग्य तऱ्हेने सांभाळता येईल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. ओळखीच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. कौटुंबिक प्रश्न मार्गी लावता येईल. मोठ्यांच्या सहवासात राहाल. काही दैनिक व्यवहारातील प्रश्न सोडविण्यात यश मिळेल.


मीन
मिळणाऱ्या यशामुळे समाधानाचे वारे वाहू लागतील. व्यवसायातील नवीन क्षेत्रात पदार्पण करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्नशील राहा. कामकाजात झोकून दिल्यास आपल्या मनातील आशा-आकांक्षांना योग्य न्याय दिल्याचे समाधान मिळू शकेल. खाण्यापिण्याची पथ्ये कटाक्षाने पाळा. एखादा प्रश्न आकस्मिकरीत्या आल्यास संयमाने त्याला सामोरे जा. गोंधळून जाऊ नका. नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहा.