शिवराज्याभिषेकाची विश्‍वविक्रमी रांगोळी :- सांगलीत शिवाजी क्रिडांगणावर सव्वा लाख चौरस फुटांची कलाकृती - विश्वविक्रम 100 तास  - 30 लाख खर्च  - 100 शिक्षक कलाकार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवराज्याभिषेकाची विश्‍वविक्रमी रांगोळी :- सांगलीत शिवाजी क्रिडांगणावर सव्वा लाख चौरस फुटांची कलाकृती - विश्वविक्रम 100 तास  - 30 लाख खर्च  - 100 शिक्षक कलाकार

Share This
खबरकट्टा / सांगली (महाराष्ट्र):


सांगलीत शिवाजी क्रिडांगणावर सव्वा लाख चौरस फुटांची कलाकृती - विश्वविक्रम 100 तास  - 30 लाख खर्च  - 100 शिक्षक कलाकार
छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रांगोळीतून साकारलेल्या शिवराज्याभिषेक प्रसंगाच्या विश्‍वविक्रमी रांगोळीचे आज  (ता. 19) शिवजयंतीला उद्‌घाटन होत आहे. 

शंभर कलाशिक्षकांनी पाच दिवस आपली कलापणास लावून सव्वा लाख चौरस फुटांची रांगोळी पूर्ण केली आहे. शिवजयंतीपासून ती पाहण्यास खुली होईल. रंगावलीकार आदमअली मुजावर यांच्यासह जिल्ह्यातील शंभर कलाशिक्षकांनी ही कलाकृती सादर केली आहे. 

रांगोळीचे उद्‌घाटन आज (ता. 19) सायंकाळी सहा वाजता खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत होत आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार, नगरसेवकांना निमंत्रित केल्याची माहिती श्री. मुजावर यांनी दिली. ही रांगोळी चार दिवस नागरिकांना पाहता येईल.

 शिवाजी स्टेडियमवर 250 फूट बाय 500 फुटांची रांगोळी साकारली आहे. एकूण 30 टन रांगोळी व रंग लागला. विक्रम पूर्ण होईपर्यंचा खर्च अंदाजे 30 लाख आहे. नागरिकांनी आर्थिक सहकार्य करावे. शिवराज्याभिषेकाची विश्वविक्रमी रांगोळी उत्सव समिती स्थापन करून रितसर नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. बॅंकेत त्यासाठी खाते उघडण्यात आले आहे. 

एकाचवेळी नऊ विक्रम :

मुजावर म्हणाले, "शिवराज्याभिषेकाच्या विश्वविक्रमी रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक, इंडिया बुक, गुगल बुक, ग्लोबल बुक, वर्ल्ड बुक, गोल्डन बुक, युनिक बुक अशा नऊ ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केली आहे. एकाचवेळी सर्व ठिकाणी नोंद होणार आहे.