राज्यात 1 फेब्रुवारी 2019 पासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्बलांना 10टक्के आरक्षण लागू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यात 1 फेब्रुवारी 2019 पासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्बलांना 10टक्के आरक्षण लागू

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र :
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण व नोकरीत संधी मिळावी, यासाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या महिन्यात घेतला. त्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ देणाऱ्या राज्यांमध्ये गुजरात पाठोपाठ महारष्ट्रातही लागू करण्यात आले आहे .

राज्यातील आरक्षण नसलेल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण लागू झाले आहे. यासंदर्भात सरकारने मंगळवारी 'जीआर' जारी केला. 

१ फेब्रुवारीपासून आरक्षण लागू करण्यात आले. हा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही राखीव जातीत समावेश नसल्याचा उल्लेख असणारे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने देशातील आरक्षण नसलेल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याबाबत घटनादुरुस्ती केली. या निर्णयाची अंमबजावणी करण्यावर राज्याच्या कॅबिनेट आठवभरापूर्वी शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आता जीआर जारी करण्यात आला. आठ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्यांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल.