राजुरा तालुक्यातील पहिली स्वतःची वेबसाईट असल्याच्या मान खामोना ग्राम पंचायतीकडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा तालुक्यातील पहिली स्वतःची वेबसाईट असल्याच्या मान खामोना ग्राम पंचायतीकडे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दीपक शर्मा :राजुरा) : 
-नुकतीच १८ जानेवारी ला तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायतीचा मान मिळविणाऱ्या खामोना पंचायत ने आता राजुरा तालुक्यात स्वतःची पहिली वेबसाईट असलेली ग्रामपंचायत चा मान पटकावला आहे. 

ग्रामपंचायत खामोना नुकतीच तालुक्यातील प्रथम पेपरलेस झाल्याचे जाहीर करण्यात आले त्या नंतर पुन्हा एक नाविन्यपूर्ण उप
क्रम म्हणून ग्रामपंचायत ने स्वतःची वेबसाईट विकसित केली. 
http//gpkhamona.org अशी वेबसाईट लिंक आहे यात ग्रामपंचायत ची सर्व प्राथमिक माहिती तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांची माहिती, तसेच एसएमएस द्वारे सर्व सूचना ग्रामस्थांना पुरविण्यात येणार आहे. आज एका छोटेखानी समारंभात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच लहूजी चहारे यांचे हस्ते वेबसाईट चे लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी विस्तार अधिकारी अमित महाजनवार, पारखी सर, उपसरपंच रेखा पिंपळशेंडे, सदस्य मारोती चन्ने, पोलीस पाटील चहारे, सचिव मिलिंद देवगडे व गावातील शेकडो  नागरीक उपस्थित होते. 


याप्रसंगी ग्रामपंचायत तर्फे वाचनालाय स्थापन करण्यात आले त्याचे उदघाटन गट विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत रामावत हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत पेपरलेस करणे करिता मोलाचा वाटा असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालक रजनी शेंडे यांचा रामावत यांच्या हस्ते पंचायत समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी रामवात यांनी खामोना ग्रामपंचायतच्या सरपंच, सर्व सदस्य व सचिव यांचे अभिनंदन केले व तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनी सुध्दा याच प्रमाणे विकासात अग्रेसर राहण्या करिता सर्वोतोपरी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले.