मांसाहार आणि आयुर्वेद .....!!! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मांसाहार आणि आयुर्वेद .....!!!

Share This
खबरकट्टा /आरोग्य (रविवार विशेष):

बऱ्याच जणांना मांसाहार करावा कि नको याबाबत फार शंका मनात असते . शाकाहारी लोक मांसाहाराची प्रमाणाबाहेर हेटाळणी करत असतात असे व्यवहारात दिसत असते.

पण आयुर्वेद हा मांसाहाराबद्दल काय म्हणतो ते पाहूया.
आयुर्वेदाच्या जवळ जवळ सर्व ग्रंथांमध्ये मांसाहाराचे सविस्तर वर्णन केले असून काही ठिकाणी तो प्रशस्त मानला आहे.सामान्य जीवनात पूर्वी मांसाहार सामान्य होता असे ढीगभर संदर्भ आढळतात.

१. पंचकर्म करताना जी स्नेहद्रव्ये म्हणजे म्हणजे तेलतूप सदृश पदार्थ सांगितले आहेत त्यात वसा (चरबी ) आणि मज्जा (हाडाच्या पोकळीतील तेलसदृश पदार्थ ) यांचे सेवन करावे असे सांगितले आहे . सर्व ग्रंथात हे वर्णन आढळते .

२. सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या मांसाचे गुणधर्म सांगताना गायीच्या मांसाचे पण वर्णन आले आहे . गायीचे मांस त्रिदोषकारक म्हणजे सर्व दोषांना दुषित करणारे असते म्हणून ते आपल्या धर्मात निषिद्ध आहे.
असा शास्त्रोक्त दृष्टीकोन आयुर्वेद सांगतो.
प्रत्यक्षात सुद्धा गोमांस भक्षण करणाऱ्या रुग्णांमध्ये होणारे आजार असाध्य आणि भयानक रूप धारण करतात . अशा रोगांची चिकित्सा करणे अशक्य असते .

३. मांसाहार भक्षण करणारी माणसे रागीट , हिंसक , निर्दयी होतात असा विचित्र समज काही लोक पसरवतात.खर तर मांस कोणत्या प्राण्याचे खावे कसे खावे , शिजवताना काय काळजी घ्यावी असे सविस्तर वर्णन ग्रंथांमध्ये आढळते . अशा पद्धतीने तयार केलेले मांस हे पचायला हलके आणि शरीराला उर्जा देणारे असते. 

४. क्षयरोग , रक्ताची कमतरता , दीर्घकालीन आजार यात शरीराला आलेली दुर्बलता मांसाच्या योग्य सेवनाने लगेच कमी होते.
क्षयरोग म्हणजेच टी. बी . या व्याधीत मांसरसाचे शास्त्रोक्त सेवन खुपच परिणामकारक दिसते.

५. एक औषध म्हणून मांससेवन खूप उपयुक्त ठरते . त्यावेळी धार्मिक बंधने बाजूला ठेऊन चिकित्सा घेतल्यास खूप फायदा होतो.


ब्राॅयलर कोंबडी, वाळवलेले, खारवलेले मासे/ बोंबील , कोळंबी , बांगडा असा काही मांसाहार शरीराला उपयुक्त न ठरता त्रासदायक ठरतो असे पाहण्यात आले आहे.त्यामुळे मांसाहार सांभाळून करणे हितकारक.

(या लेखाचा उद्देश मांसाहाराचा प्रसार नसून वाचकांनी आयुर्वेद म्हणजे मांसाहारी औषधे असा गैरसमज करून घेऊ नये . आयुर्वेद सारख्या प्रगत शास्त्रात मांसाहार कमी लेखलेला नाही हेच यातून सांगायचे आहे .)