वनोजा,अंतरगाव(बु),पिपरी या गावातील स्मशानभूमी शेड मंजूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वनोजा,अंतरगाव(बु),पिपरी या गावातील स्मशानभूमी शेड मंजूर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
-भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या पाठपुराव्याला यश.


 कोरपना तालुक्यातील वनोजा,अंतरगाव(बु),पिपरी या गावातील स्मशानभूमी शेड नक्षलग्रस्त निधी सन २०१८-१९ अंतर्गत मंजूर झाले असून याकरिता भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.

या करिता त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार अँड.संजय धोटे,जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,तहसीलदार हरीश गाडे,गट विकास अधिकारी संदीप घोंन्सीकर यांच्याकडे मागणी करून पत्रव्यवहार केला सदर मागणीनुसार सर्व मान्यवरांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना नक्षलग्रस्त निधी सन २०१८-१९ अंर्तगत कामे मंजूर करून निधी उपलब्ध करण्याची विनंती पत्राद्वारे केली होती,त्यानुशंघाने जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सदर कामे नक्षलग्रस्त आराखड्यात समाविष्ट केली.त्यानुसार नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजी शासन निर्णय काढत सदर कामांना निधी उपलब्ध करून दिला होता त्यांनतर सर्व कामांची अंदाजपत्रके नियोजन विभागाला सादर झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी २८ जानेवारी २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेश दिलेला आहे.
            
          कोरपना तालुक्यातील वनोजा व पिपरी गावांमध्ये स्मशानभूमी शेडची व्यवस्था नव्हती तसेच अंतरगाव(बु) येथील स्मशानभूमी शेड अत्यंत बिकट अवस्थेत होते,त्यामुळे नागरिकांचा अत्यंसंस्कार करताना गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता,सदर गावातील नागरिकांनी स्मशानभूमी शेडची मागणी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्याकडे केली त्याअनुषंगाने आशिष ताजने यांनी लोकप्रनिधी व अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरु केला त्यामुळे सदर मागणीला यश मिळत वनोजा,पिपरी व अंतरगाव(बु) या तिन्ही गावांना प्रत्येकी ५ लक्ष निधी असा एकूण १५ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. सदर गावात स्मशानभूमी शेडचे बांधकाम निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
    
         सदर स्मशानभूमी शेड मंजूर झाल्यामुळे भाजपा  शक्ती केंद्र प्रमुख सत्यवान चामाटे वनोजा सरपंच सविताताई पेटकर , पिपरी सरपंच कवडु पाटील कुंभारे, वनोजा उपसरपंच गुरुदास वराते, बंडू पाटील वडस्कर, गणेश गिरसावडे, अमोल भोंगळे, सतीश पोडे, गजानन मोरे, विलास चालेकर, कमलाकर गुंजेकर, साईनाथ तिखट, गजानन पाचभाई,विनोद पेटकर यांनी आभार व्यक्त केले आहे.