युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे : डॉ. मोहन भागवत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे : डॉ. मोहन भागवत

Share This

खबरकट्टा/नागपूर : युद्ध नसतानाही देशाचे जवान हुतात्मा होत आहेत. युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे ? पण हे घडत आहे. हे थांबवायचे असेल तर आपल्या प्रत्येकाला देशाला मोठे करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले.  

भारतासह इस्राईल आणि जपानने एकाच वेळी स्वातंत्र्योत्तर प्रवासाला प्रारंभ केला. यातील दोन देशांनी 70 वर्षांत बरीच प्रगती साधून घेतली. मात्र, त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या संपन्न असतानाही भारताला हवा तसा विकास साधता आला नाही. भारताच्या विकासाची एकूणच गती संथ असल्याची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्‍त केली.
डॉ. भागवत म्हणाले की, इस्राईल 1948 साली स्वतंत्र झाला. त्यानंतर आठ देशांनी त्यावर आक्रमण केले. तरी या देशाने प्रत्येक संकटावर मात करीत वाळवंटाचे नंदनवन केले. आता इस्राईलचे कृषी विकासाचे मॉडेल जगात सर्वश्रुत असून, त्यांच्याकडे वाकडी नजर करणाऱ्यांचे काय होते हे साऱ्यांना माहीत झाले आहे. जपानचेही असेच आहे. चारही बाजूने समुद्र असतानाही आर्थिक क्षमता निर्माण करून त्यांनी विकास साधला. आज चीनसोबत पंगा घेण्याची त्यांची ताकद आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारताच्या तिजोरीत तीस हजार कोटी होते व इंग्लंडकडून 1600 कोटी घेणे बाकी होते तरी आपल्या देशाचा आज हवा तसा विकास बघायला मिळत नाही.
भविष्य तरुणांच्या हाती
महागाई व बेरोजगारी सामान्य माणसाने वाढवली नसताना त्याचा त्रास सर्वांना होत आहे. आपण सहन करत जगतो आहोत तसेच आपल्या मुलांनाही शिकविण्याची गरज आहे. कारण देश तरुणांचा असल्याने येत्या 30 वर्षांत या भारताचे भविष्य तरुणांच्या हाती राहील. पुढील पाच वर्षांत त्याची चिन्हे दिसतील, असेही ते म्हणाले.