राजुरा तालुक्यातील पांदण रस्ते,४०५४ व ५०५४ अंतर्गत रस्ते बांधकामासाठी २ कोटी १३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा तालुक्यातील पांदण रस्ते,४०५४ व ५०५४ अंतर्गत रस्ते बांधकामासाठी २ कोटी १३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

Share This
-आमदार अँड संजय धोटे यांच्या प्रयत्नाचे फलीत
 खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा :राजुरा ):
 
     अनेक वर्षांपासून राजुरा तालुक्यातील नागरिकांची मागणी लक्षात घेता आमदार अँड संजय धोटे यांनी पाठपुरावा करून राजुरा तालुक्याला पांदण रस्ते,तसेच ४०५४ व ५०५४ अंतर्गत रस्ते बांधकामासाठी ऐकून २ कोटी १३ लक्ष रुपयांचा निधी आमदार अँड संजय धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे.

राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी तसेच शेतात जायला होत असलेल्या अडीअडचणी लक्षात घेता हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आमदार अँड संजय धोटे यांनी नेहमी शेतकरी,शेतमजूर,यांच्या साठी पुढे येऊन त्याच्यासाठी सहकार्य केले आहे.

आमदार अँड धोटे हे कोणतेही विकास काम करण्यासाठी नेहमी धडपड करत असतो,त्याची ही धडपड लोकांच्या हिताचे कार्य करण्याची असते याच अनुषंगाने या कामाला निधी उपलब्ध झाला आहे.
 
राजुरा तालुक्यातील उपरवाही, मंगी,भुरकुंडा, रानवेली रस्त्यासाठी ५० लक्ष,गोवरी गोयेगाव,खामोना रस्त्यासाठी २९ लक्ष,विरुर,सुब्बई, चिंचोली रस्त्यासाठी ४५ लक्ष,अहेरी,वरूर रस्त्यासाठी २० लक्ष,मंगी,ते भेंडवी रस्त्यासाठी २० लक्ष,तसेच पांदण रस्ते वरूर,सुमठाना ते साखरवाही पर्यत आर्वी ते सुमठाना पर्यत पांढरपौनी ते अहेरी पर्यत खामोना ते बोडखा पर्यत मंगी ते पारधी गुडा पर्यत खिर्डी ते जगुगुडा पर्यत तसेच भुरकुंडा या ऐकून पांदण रस्त्याच्या बांधकामासाठी ४० लक्ष रुपयांची निधी मंजूर झाला आहे.

हे सर्व रस्ते व पांदण रस्ते मंजूर करून दिल्याबद्दल आमदार अँड संजय धोटे यांचे समस्त गावातील नागरिकांनी अभिनंदन करून आभार मानले आहे.