राजुरा कृषि महोत्सवाचा समारोप शेतक-यांच्या सुख सन्मानासाठी विधानमंडळात सजग लोकप्रतिनिधींची गरज - गुणवंत हंगरगेकर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा कृषि महोत्सवाचा समारोप शेतक-यांच्या सुख सन्मानासाठी विधानमंडळात सजग लोकप्रतिनिधींची गरज - गुणवंत हंगरगेकर

Share This

           
खबरकट्टा / चंद्रपूर :
शेतकरी, शेतमजूर यासह सर्व श्रम  करणा-यांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क असुन यासाठी केंद्र व राज्यात जनतेने ख-या अर्थाने प्रामाणिकपणे काम करणा-या व लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक,अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे,असे मत शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष व शेतीतज्ञ गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले.          राजुरा येथे शेतकरी संघटनेने आयोजीत केलेल्या कृषि महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात इंजिनीअर गुणवंत पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी भूषविले. प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री डाँ.रमेश गजबे,माजी आमदार सौ. सरोज काशीकर, पुरातत्व विभागाचे माजी संचालक डाँ.जी.एस खाजा, चंद्रपूरचे उद्योजक रतिलाल चव्हाण, डाँ. दाभेरे, पत्रकार बी.के.खाजा, कवडू पोटे,  नारायण गड्डमवार,रंभा गोठी,सतिश दाणी, उल्हास कोटमकर,तेजस्विनी कावळे, अरुण नवले,अँड.मुर्लीधर देवाळकर, निळकंठ कोरांगे,रमेश नळे, सिंधु बारसिंगे,रविद्र गोखरे,प्रभाकर ढवस, भाऊजी किन्नाके, अँड.श्रिनिवास मुसळे,ज्योती तोटेवार, कमल वडस्कर, हरीदास बोरकुटे,नानाजी पोटे, ,संजय करमनकर,रवि गोखरे, आबाजी ढवस, अँड. राजेंद्र जेनेकर,सुभाष रामगिरवार,रमाकांत मालेकर व्यासपिठावर उपस्थित होते.

      अध्यक्षस्थानाहून बोलतांना अँड. वामनराव चटप म्हणाले की,शेतक-यांचे आत्मभान जागृत करण्यात हा महोत्सव यशस्वी झाला अाहे. एका बाजुला नविन तंत्रज्ञानाची माहिती तर दुस-या बाजुला शेतीसंबंधी विविध विषयांचे विचारमंथन व तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे शेतकरी अधिक प्रगल्भ होवून आपल्या व्यवसायाकडे नव्या दृष्टीकोनाने बघेल. या महोत्सवात शेतकरी, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी या सर्वांनाच काही नाविन्यपुर्ण बघायला अथवा शिकायला मिळाले आहे. यानिमीत्ताने सर्व शेतकरी एकत्र येऊन आपल्या लुटीचा, सरकारी अन्याय व शोषणाचा, शेतमालाच्या किंमतीचा, देशावरील कर्ज व अर्थशात्राचा विषय समजून घेऊ शकले, ही आनंदाची बाब आहे. परंतू आपल्या सन्मानासाठी आता लढाईला सिध्द होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आपल्या प्रभावी भाषणात अँड. चटप यांनी केले. 

           या कार्यक्रमात शेती,उद्योग, समाजसेवा आणि तीस वर्षापासुन चळवळीला साथ देणा-या किसन अवताडे,गोसाई देरकर, रंभा नवरतन गोठी, रुखमा राठोड, संतोष आस्वले, किसन महात्मे, श्यामराव ठाणेकर, शेख खाजा,देवाजी हुलके,खुशाल सोयाम, मारोती लोहे,आबाजी धानोरकर,बाबुराव चिकटे,देविदास वारे, डाँ.भास्कर मुसळे, विठ्ठल दोरखंडे,डाँ. आनंद निरंजने, भिवसन गायकवाड,मारोतराव येरणे,फकरु मडावी,अनिल वलादे, सायसराव कुंडगिर, बाबुराव चिकटे,अंजना पेंदोर, विमल वाघुजी गेडाम, मुकुंद चन्ने यांचेसह अनेक मान्यवरांचा शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ  देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर दिवे , संचालन प्राचार्य अनिल ठाकुरवार व आभारप्रदर्शन कपिल इद्दे यांनी केले.या कार्यक्रमाला बंडू राजुरकर,अभिजीत सावंत,अनंता येरणे,पी.यु.बोंडे,आबाजी धानोरकर, नरेंद्र काकडे,बंडू माणूसमारे, हसनभाई रिझवी, दिनकर डोहे इ.सह मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.