शिवसेनेचे राजुरा तालुका अध्यक्ष बबन उरकुडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेनेचे राजुरा तालुका अध्यक्ष बबन उरकुडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

शिवसेना राजुरा तालुका प्रमुख बबनभाऊ उरकुडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 


ही संघटना भारतीय कामगार सेनेच्या महासंघाशी संलग्नित असून याचे युनिट  जिल्ह्यात सध्यस्थित चंद्रपूर महाऔष्णिक वितरण केंद्रात कार्यरत आहे.

या सेनेचे अध्यक्ष श्री रवी शिराळकर, कार्याध्यक्ष श्री कृष्णा गायगोले,व राज्य सहसचिव लोकेश कोर्टरंगे यांनी बबनभाऊंच्या कार्याची दखल तसेच त्यांची अनेक लहान मोठ्या कारखान्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी करत असलेली  मदत ध्यानात घेऊन सर्वानुमते निवड घोषित केली. निवडीचे पत्र हाती पडताच बबन भाऊ व त्यांना अनेक कार्यकर्त्यात नवीन जोश व जल्लोष बघायला मिळत आहे.