युवकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी जनजागृती करावी -- तहसीलदार डॉ. रवींद्र होळी. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

युवकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी जनजागृती करावी -- तहसीलदार डॉ. रवींद्र होळी.

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर (दिपक शर्मा : राजुरा):
-रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात ईव्हीएम मशीन आणि व्ही. व्ही. पॅट प्रात्यक्षिक.

रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा येथे आज दिनांक २८ जानेवारी रोजी राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, लोकशाही क्लब आणि तहसील कार्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने ईव्हीएम मशीन आणि व्ही. व्ही. पॅट प्रात्यक्षिक घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले तसेच मतदार जागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे हे होते तर उद्घाटक तथा मुख्य मार्गदर्शक राजुराचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी हे होते, प्रमुख अतिथी म्हणून मंडळ अधिकारी निरंजन गोरे, तलाठी तथा मास्टर ट्रेनर समिर वाटेकर, दिपक गोहणे, प्रा. समिर पठाण, प्रा. यश्वीनी घोटेकर, प्रा. निच्छल इटणकर, प्रा. सत्यपाल उरकुडे, प्रा. नरेंद्र धोबे, प्रा. मधुकर साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात तहसीलदार डॉ. होळी यांनी भारतीय लोकशाही ही परिपक्व होण्यासाठी नवं मतदारांनी दक्षता पुर्वक मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा सोबतच समाजात जनजागृती करण्यासाठी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

तर आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य प्रफुल्ल शेंडे यांनी लोकशाही निवडणूक व सुशासन याविषयावर मार्गदर्शन केले. युवकांनी व्यवस्था परिवर्तनासाठी जबाबदारीने मतदान करावे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य प्रतिनिधींची निवड करावी. तसेच लोकशाही व्यवस्था जीवनात स्विकारावी असे आवाहन केले.

या प्रसंगी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवृंद, शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शितल लोणारे हिने केले तर आभारप्रदर्शन कु. अश्विनी बोढे हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिक मिथलेश मुनगंटीवार शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे तथा सर्व विद्यार्थ्यांनी अनमोल सहकार्य केले.