खबरकट्टा /चंद्रपूर (दिपक शर्मा / राजुरा):
-पाचगाव येथे मकरसंक्रांत निमित्य हळदी कुंकू सत्कार संभारभ संपन्न.
आपल्या देशातील संविधानाने महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले असून आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे.
महिला वर्ग आपले कार्य प्रामाणिकपणे करून यशाची सर्वच शिखरे पांदक्रांत करीत असून राजकीय क्षेत्रातील महिलांनी मेहनतीच्या बळावर आपले अस्तितत्व सिद्ध केले आहे.
आज ग्रामीण भागातील महिलाही धाडसाने राजकीय क्षेत्रात काम करीत यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आपला ठसा उमटवित आहे.
पाचगाव क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्य सौ सुनंदा डोंगे ह्यांनीही अल्पवधीत यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण केली असून आमदार अँड संजय धोटे ह्यांच्या मार्गदर्शनात ह्या क्षेत्रात विकासाची गंगा खेचून आणण्यात त्या नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे ह्यांनी पाचगाव येथे भाजपा महिला आघाडी द्वारे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केला.
जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे ह्यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.
ह्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश धोटे, तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ राशिक उदे, जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे, पंचायत समिती सदस्य सौ सुनंदा डोंगे,सौ स्वाती देशपांडे, सौ सुरेखा बोरकुटे, सौ भावना पंचमथिया, संदीप गायकवाड, प्रकाश पाटणकर, गोपाल झामुरवार, व इतर मान्यवर उपस्थित होते.
ह्यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाचगावच्या सरपंच सौ रसिका उदे,कळमनाच्या सरपंच सौ नुतन आत्राम,चांदनवाहिच्या सरपंच सौ सुषमा धानोरकर,गोवरीच्या सरपंच सौ पौर्णिमा उरकुडे,अंगणवाडी सेविका सौ अस्मिता वांढरे,सौ गिरसावळे मॅडम,सौ विना बोबडे,रविना काळे,सौ कल्पना झाडे,निता खणके,सौ अर्चना चाललावार, सौ माणिक्षा नळे,सौ अर्चना मुन,सौ जया मडावी,सौ शोभा सुरपाम,सौ अंजनाबाई भोयर,सौ सखुबाई जाभोर,गिरजाबाई शेडमाके, अनिता चहारे,सौ वंदना लांडे,ह्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुनंदा डोंगे,ह्यानी तर आभार प्रदर्शन सौ कोहपरे मॅडम ह्यांनी केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरडकर मॅडम ह्यांनी केले.