महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अनेक मागण्यासाठी चंद्रपुर येथे विराट मोर्चा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अनेक मागण्यासाठी चंद्रपुर येथे विराट मोर्चा

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

आयटक च्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन श्रेणी सहित अन्य आर्थिक लाभ लागू करण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन दि 19 जानेवारी 2019 रोजी आझाद बगीचा चंद्रपूर येथून 12 वाजता मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार अर्थ मंत्री यांच्या चंद्रपूर येथील जण संपर्क कार्यालयावर राज्यव्यापी विराट काढण्यात आला.
या मोर्च्या चे नेतृत्व ग्राम पंचायत कर्मचारी महा संघाचे राज्य अध्यक्ष कॉ तानाजी ठोबरे,कार्याध्यक्ष कॉ तुकाराम भस्मे,चंद्रपूर जिला आयटक सचिव कॉ विनोद झोडगे,कॉ नामदेव कंनाके, राज्य चिटणीस कॉ मिलिंद गणवीर,संतोष दास,सखाराम दुर्गुडे,मंगेश मात्रें, श्याम चिंचने,किरण पांचाळ,अमृत महाजन,राजू गैनेवर आदींनी केले ,सरकार विरोधी घोषणा देत हा आक्रमक मोर्चा जनसंपर्क कार्यालयावर धडकल्या नंतर अर्थ मंत्री गैर हजर असल्याने त्यांच्या वतीने त्याचे पी ए.धवने यांनी निवेदन स्वीकारून मा.सुधीर भाऊ यांच्या शी भ्रमण ध्वनी करून संघटनेचे राज्य अध्यक्ष मा.तानाजी ठोबरे यांच्याशी चर्चा घडवून आणली व येत्या मंगळवारला ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे निश्चित झाले.
या राज्यव्यापी विराट मोरच्यात ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यान प्रमाणे वेतन श्रेणी व अन्य आर्थिक लाभ लागू करा,ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना उपदानाचा लाभ लागू करा.वेतना साठी 90% वसुलीची अट रद्द करा ,मासिक 6000 रु.पेन्शन लागू करा आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या मोरच्यात राज्यभरातून हजारो ग्राम पंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.