जंगलात लपवून ठेवलेला कोळसा वन अधिकाऱ्यांनी केला जप्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जंगलात लपवून ठेवलेला कोळसा वन अधिकाऱ्यांनी केला जप्त

Share This
खबरकट्टा :चंद्रपूर (दीपक शर्मा,राजुरा)
राजुरा वन विभाग परिसरातील रामपूर माथरा वन परिक्षेत्र क्रमांक 152 ,येथे अवैधरित्या लपवून ठेवलेला  दोन ट्रॅक्टर कोळसा वन अधिकाऱ्यांनी जप्त केला.
दिनांक 23जानेवारी ला सकाळी वन  कर्मचारी नियमित गस्तीवर गेले असता त्यांना दोन ट्रॅक्टर कोळसा लपवून ठेवलेला आढाळला,याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यावर अधिकाऱ्यांनी लगेच घटना स्थळ गाठत पंचनामा करून जप्तीची कारवाही करून  तुरंत मध्यवर्ती डेपो कडे रवाना केले. प्राथमिक चोकशी दरम्यान कुणीही त्याची मालकी स्वीकारायला समोर आले नाही.

वन अधिकाऱ्यांनी वन अधिनियम कायदा 1927,कलम 26(1),2(4) नुसार अभिज्ञ व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून उपविभाग वनअधिकारी अमोल गरकल यांच्या मार्गदर्शनात वन परीक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या नेतृत्वात वनक्षेत्र सहायक गोविंदवार, वनसंरक्षक चोबे ,कारेकर, पेंदोर व शेंडे अधिक तपास करत आहेत .