खबरकट्टा/ चंद्रपूर : (दिपक शर्मा : राजुरा)
-अॅड संजय धोटे यांच्या प्रयत्नाला यश.
-अॅड संजय धोटे यांच्या प्रयत्नाला यश.
लोकप्रतिनिधिनी सुचविलेल्या ग्रामीण मागास भागाच्या मुलभुत व पायाभुत विकास कामे पुर्ण करण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड संजय धोटे यांनी नक्षल भागाच्या विकास विशेष कृती कार्यक्रम अतंर्गत राजुरा,गोंडपिपरी,जिवती, कोरपना तालुक्यातील आदिवासी व मागास क्षेत्रातील गावाचा जलदगतीने विकास व्हावा हया उद्देशाने नागरीकाच्या कामाची मागणी व आवश्यक गरजेची विकासकामे अगंणवाडी सरक्षण भिंत,जि प शाळा इमारत दुरूस्ती, शाळेत पिण्याचे पाणी व्यवस्था, सरक्षणं भीतीं,दुष्काळग्रस्त गुडे, पाडयावर कुपनलिका ग्रामीण पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्ती बंद योजना कार्यान्वीत करणे पाणी शुध्दीकरण यंत्र बसविणे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर बांधकाम करणे स्मशानभुमी शेड व रसत्याचे बांधकाम आदीवासी गावात वाचनालय सुरू करणे स्वास्थ केन्द्रात पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आमदार धोटे यांनी पाठपुरावा केला होता.
यासाठी शासनाने सिमेवरील मागास भागातील आवश्यक कामाना प्राधान्य देऊन दुष्काळ ग्रस्त पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी निर्णय घेत २ कोटी ५६ लक्ष निधि मान्यता शासनाने दिली बाधकाम विभाग पाणी पुरवठा विभाग महीला बालकल्याण आरोग्य विभागास निधि उपलब्ध झाल्याने ग्रामीण नागरीकाची मागणी पुर्णंकरीत विकासाला गती येणार असल्याने अनेक गावातील जनता उत्साह आहे.