प्रत्येक नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार -- आमदार अँड संजय धोटे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रत्येक नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार -- आमदार अँड संजय धोटे

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :
-जिवती येथील २ कोटी रुपयांचा विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

जिवती हा तालुका चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाते, हा तालुका अजूनही विकासा पासून वंचीत राहिला आहे.

या भागात आदिवासी समाज बांधवांची लोकसंख्या भरपुर आहे.
जिवती नगर पंचायतची निर्मिती तीन वर्षाआधी झाली पण येथील विकासाला गती प्राप्त झाली नाही.

परंतु आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली मागील सहा महिन्या आधी भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली आणि विकासाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

नगर पंचायत जिवती येथील भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष म्हणून सौ पुष्पा नैताम ह्या विराजमान झाल्या.

जिवती शहराच्या विकासासाठी आमदार अँड संजय धोटे यांनी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला.

तसेच ना सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार अँड संजय धोटे प्रयत्नाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

५ कोटी रुपयांचा विकास कामाचा आराखडा तयार करून संबधीत विभागाला पाठवला असून लवकरच या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.

आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते मंजूर झालेल्या २ कोटी रुपयांचा भूमिपूजन सोहळा दिनांक ३०/०१/२०१९ ला संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सौ पुष्पा नैताम,जिल्हा परिषद सभापती सौ गोदावरी केंद्रे,भाजपा तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुरेश केंद्रे,उपसभापती महेश देवकते,नगरउपाध्यक्ष अशापाक शेख,मुख्याधिकारी विशाखा शेरकी,बांधकाम सभापती सौ सुनंदा राठोड,महिला बालकल्याण सभापती सौ सविता आडे,पाणी पुरवठा सभापती वसंत राठोड, नगरसेवक सर्वश्री अमर राठोड, केशव चव्हाण, मारोती बेल्लाळे, रशीद अल्ली,सौ रंजना जाधव,सौ कविता आडे,सौ किरण चव्हाण,गोपीनाथ चव्हाण,सौ अनुसया राठोड,रोहिदास आडे, शरद चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार अँड संजय धोटे यांनी बोलताना सांगितले की विकास साधण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो जिवतीच्या   शहराचा २ कोटी रुपयांचा विकास कामाचा आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला याचा मला मनापासून आनंद होत आहे.

या विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मला आपण निवडून दिले तेव्हा आपल्या तालुक्यातील समस्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.


याभागातील रस्ते,पाण्याचे पाणी तसेच विज या समस्या आपण जास्त लक्ष देत आहे.
प्रत्येक नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपण नेहमी प्रयत्न करणार  करत असल्याचे यावेळी आमदार अँड संजय धोटे सांगितले,जिवती शहराची वेगळी ओळख निर्माण व्हावी तसेच नाली रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी सहकार्य करणार असल्याचेही  यावेळी बोलताना सांगितले,कार्यक्रमा प्रसंगी जिवती शहरातील नागरिका मोठया संख्येने उपस्थित होते.