कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या बळकटीसाठी जोमाने कामाला लागावे. -- माजी आमदार सुभाष धोटे. अध्यक्ष, चंद्रपूर काँग्रेस. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या बळकटीसाठी जोमाने कामाला लागावे. -- माजी आमदार सुभाष धोटे. अध्यक्ष, चंद्रपूर काँग्रेस.

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर: (दिपक शर्मा/ राजुरा):
-काँग्रेस कमिटी कार्यालय उद्घाटन तथा सत्कार समारंभ संपन्न 

 आज दिनांक ३१ जानेवारी २०१९ रोजी दुपारी १२:३० वाजता गांधी भवन, गांधी चौक, राजुरा येथे राजुरा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे गांधी भवन कार्यालयाचे उद्घाटन तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांची चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नियुक्त झाल्याबद्दल सत्कार समारंभ तसेच कार्यकर्ता बैठकीचे आयोजन उत्साहात संपन्न झाले. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर हे होते तर उद्घाटक चंद्रपूर काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे होते, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष सुर्यकान्त खनके, सभापती कुंदा जेनेकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ चन्ने, आदिवासींचे जेष्ठ नेते लिंगू पाटील कूमरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अब्दुल हमीद अब्दुल गणी पटेल, इन्टकचे अध्यक्ष शंकर दास, सुदर्शन डोहे, आर. आर. यादव, डॉ. उमाकांत धोटे, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव देशपांडे, अँड. सदानंद लांडे, सय्यद सकावत अली, दिलीप नलगे, उमाकांत धांडे, शरिफ सिध्दिकी, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, विजय उपरे, माजी सभापती निर्मला कुळमेथे, समाजसेविका संगीता धोटे, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, नगरसेवक हरजितसिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, नगरसेविका साधना भाके, दिपा करमणकर, संध्या चांदेकर, शारदा टिपले, गिता रोहने, जि. प. सदस्य डॉ. नामदेव करमनकर, प. स. सदस्य तुकाराम माणूसमारे, मंगेश गुरूनुले, रामदास पुसाम, बापू धोटे दिलीप कोत्पलीवार, युसुफभाई आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या सत्काराला उत्तर देताना कार्यक्रमाचे उद्घाटक तथा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी देशात, राज्यात आणि जिल्ह्यात काँग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी आपण पुर्ण ताकदीने पार पाळून जिल्ह्य़ात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ असा आशावाद व्यक्त केला. अध्यक्षीय मार्गदर्शनातून मनोहर पाऊनकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी सुभाषभाऊंची जिल्हाध्यक्षपदी केलीली नवड अतिशय योग्य असून माझ्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत मी अनेक जिल्हाध्यक्ष पाहिले परंतु सुभाषभाऊंचा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून जो भव्य दिव्य सत्कार झाला तसा मी कुणाचाही पाहिला नाही. मला विश्वास आहे की सुभाषभाऊंच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसला नवी ऊर्जा मिळेल आणि काँग्रेस पून्हा संपूर्ण जिल्ह्य़ात उत्तम कामगिरी करून दाखवेल. 

या प्रसंगी सर्वप्रथम काँग्रेसचे माजी प. स सभापती स्वर्गीय मारोती पाटील जेनेकर यांच्या आत्म्याला शांती म्हणून दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर राजुरा तालुका काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला काँग्रेसचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे संचालक, सदस्य, बाजार समितीचे संचालक, सदस्य, शहरातील गणमान्य व्यापारी, राजुरा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, किसान सेल, शहर काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती, जमाती विभाग, एनएसयुआय तथा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुरा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा पाटील लांडे यांनी केले. संचालन राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष नंदु वाढई यांनी केले.