महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या चंद्रपूर कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या चंद्रपूर कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन

Share This
मान्यवरांच्या हस्ते पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे ,जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे,जिल्हा कार्याध्यक्ष जितूभाऊ चोरडीया यांचा सत्कार.

खबरकट्टा /चंद्रपूर :

           
           महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यालयाचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्या हस्ते रविवार दिनांक 20 जानेवारी 2019 ला झाले.सोबतच संघाच्या मागील वर्षातील विविध कार्यक्रमांची माहिती देणारे नवीन वर्षाच्या कालदर्शिकेचे अनावरण ही मान्यवरांच्या हस्ते पार पडले.


      या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघांचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानशे होते तर पाहुणे म्हणून चंद्रपूर  उपपदेशिक परिवहन अधिकारी  शिंदे,जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके,साम टीव्ही चे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी व श्रमीक पञकार संघांचे जिल्हाध्यक्ष संजय तुमराम,दैनिक महासागरचे जिल्हा प्रतिनिधी व श्रमीक पञकार संघांचे कोषाध्यक्ष जितेंद्र मशारकर,दैनिक तरुन भारतचे जिल्हा प्रतिनिधी व चंद्रपूर प्रेस क्लब चे सदस्य रामगिरवार,महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघांचे जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे,कार्याध्यक्ष जितुभाऊ चोरडीया उपस्थित होते.

     कार्यालय उदघाटन प्रसंगी अध्यक्षांचे व मान्यवर पाहुण्याचे,पञकार व पञकारीता यावर मार्गदर्शन झाले.याच कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते,महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघांचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे ,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनिलभाऊ बोकडे,चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष जितुभाऊ चोरडीया यांचा सत्कार करण्यात आला.जिल्हा कार्यालय उदघाटन कार्यक्रमाच्या निमित्याने महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे जिल्हा पदाधिकारी प्रदीप रामटेके, धनराज खानोरकर, गोमती पाचभाई, सुभाष बुजोने ,विनोद दुर्गे सहित सर्व सदस्य  व जिल्ह्यातंर्गत सर्व तालुक्यातील सुधाकर श्रीरामे, प्रा .अनंत डोंगे, सय्यद शाबीर जहागीरदार, बंडू सोयाम ,केवलसिंग जुनी  नागराज मेश्राम, प्रणयकुमार बंडी, भूमन सल्लाम, सहित अनेक सदस्य आवर्जून उपस्थित होते.

      कार्यालय उदघाटन कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संघटक राजाभाऊ कुकडे यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धनराज खानोरकर यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.