बीजेएम कार्मेल अकॅडमि चंद्रपूर चा विद्यार्थी कुमार यशराज चांदेकरचा स्कूल बस खाली चिरडून मृत्यू. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बीजेएम कार्मेल अकॅडमि चंद्रपूर चा विद्यार्थी कुमार यशराज चांदेकरचा स्कूल बस खाली चिरडून मृत्यू.

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर येथील बीजेएम कार्मेल अकॅडमी कॉन्व्हेंटमधे तिसरीत शिकणाऱ्या यशराज चांदेकर,या मुलाचा स्कुलबसखाली सापडल्यानी जागीच मृत्यू झाला.

दुपारी अडीच वाजता शाळा सुटल्यानंतर बसमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली.यावेळी विद्यार्थी बसमध्ये बसल्याचं गृहीत धरून चालकानं बस मागे घेतली. बसच्या मागेच उभ्या असलेल्या यशराजवर ही बस चढली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

या शाळेच्या बसेस आपल्या आवारात न थांबता रस्त्यावर लावल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते.शिवाय रस्त्यावरील रहदारीही सुरु असते व वैयक्तिक रित्या पाल्यांना ने-आन करणाऱ्याचीही त्याच ठिकाणी गर्दी होतें.वॉर्डातील नागरिकांनी रहदारीची होणारी कोंडी बघून अनेक वेळा शाळा व्ययस्थापनाला स्कूल बस शाळेच्या आवारातच लावण्याच्या सूचनाही दिल्या होत्या परंतु शाळा व्यवस्थापनाने दखल घेतली नाही . त्यामुळेच आज या मुलाचा नाहक जीव गेला.

व्यवस्थापनाची चूक वारंवार घ्यानात आणून दिल्यावरही योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे आजची घटना घडली व नऊ वर्षीय   कुमार यशराज चांदेकर ला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे नागरिकांनी व पालकांनी जमाव करत शाळेचा घेराव केला.संतप्त जमाव बघून शाळा व्ययस्थापनाने पोलीस व दंगा नियंत्रक पथकाला पाचारण केले. यात शिवसेनेचे सुरेश पचारे व माजी नगरसेवक बंडू हजारे यांनी पुढाकार घेत नुकसान भरपाई ची मागणी केली असता बस व्यवस्थापक कुणाल एन्टरप्राइसेस ने मृतक च्या वडिलांना 25 लाखाची नुकसान भरपाई व त्याच्या भावाचे 12वि पर्यंत चे शिक्षण मोफत करण्याची ग्वाही दिली.