गणराज्यदिनी रामचंद्र महाविद्यालयाच्या रितू पेंदोर ने पटकाविला राष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गणराज्यदिनी रामचंद्र महाविद्यालयाच्या रितू पेंदोर ने पटकाविला राष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर (दिपक शर्मा :राजुरा) :

आज दिनांक २६ जानेवारी २०१९ रोज शनिवारला रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आसाम मधील गुवाहाटी येथे पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रीय जनजाती क्रीडा सम्मीट मध्ये रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुराची धावपट्टू कु. रितू रविंद्र पेंदोर हीने ३ किलो मीटर रनिंग मध्ये तिसरा आणि १४ किलो मीटर रनिंग मध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे. 

            याबद्दल इन्फंट जिजस सोसायटी राजुराचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, महाविद्यालये प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. समिर पठाण, प्रा. निच्छल इटणकर, प्रा. सत्यपाल उरकुडे, प्रा. सचिन वासाड, प्रा. नरेंद्र धोबे, प्रा. मधुकर साळवे, प्रा. यश्वीनी घोटेकर, तसेच ग्रंथपाल प्रविण बुक्कावार, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह विद्यार्थ्यांनी तिचे जोरदार स्वागत आणि अभिनंदन केले आहे.