ब्रिलियंट कॉन्व्हेंट राजुरा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संप्पन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रिलियंट कॉन्व्हेंट राजुरा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संप्पन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा / राजुरा):
स्थानिक सोमनाथपूर वार्डात गरीब, शेतमजूर, ट्रॅक ड्राइव्हर व आर्थिक कुवत कमी असलेल्या पालकांसाठी अत्यंत कमी शुल्कात इंग्रजी शिक्षण देणारी म्हणून ब्रिलियंट कॉन्व्हेंट चे नाव आघाडीवर आहे. वाजवी दारात पाल्यांनी इंग्रजी शिक्षण आमच्या कॉन्व्हेंट मध्ये विद्यार्थ्यांना द्यावें असे प्रतिपादन दीपस्तंभ बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र खैरे यांनी केले ते सोमनाथपूर येथील ब्रिलियंट कॉन्व्हेंट द्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते.

ब्रिलियंट कॉन्व्हेंट मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात एकल नृत्य स्पर्धेत अर्पिता जुनघरी हिचा प्रथम, हंसिनी बुजाडे हिला द्वितीय क्रमांक मिळाला. केजीवन मध्ये पूर्वी हनुमंते प्रथम, कामाक्षी गिरपत्तीवार द्वितीय,केजीटू - साची चिंतलवार, परी खिल्लारे द्वितीय क्रमांक पटकाविला. समूह नृत्यामध्ये नर्सरीची हुमेरा शेख व संच प्रथम, माहिरा बांबोळे व संच द्वितीय, केजीवन - आरोही कातकर व संच प्रथम, हर्षवर्धन इटनकर व संच द्वितीय, केजीटू - उत्तरा नांदेकर व संच प्रथम, वर्षिका उपरे व संच द्वितीय क्रमांक पटकाविला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ढोके सर, किरण खैरे, दीपेश गहरेदार, गौरव अट्टल, सचिन नंदीगमवार, माया ढोके, पूजा घागरगुंडे, सुरज खैरे, सुमन नगराळे, साधना भाके , मेघा अट्टल व निलेश सज्जनवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यश्वीतेकरिता संस्थेच्या शिक्षिका सविता वाकुलकर, रूप फडके, वनिता कोरडे, कल्पना गर्गेलवार, विद्या गौरकार, शारदा भलमे, कविता गर्गेलवार, संकेत बोबडे, आशा जानवे, योगीता पडवेकर, सपना नंदीगमवार, सविता अळे, विजया दुसारी, शारदा मेश्राम यांनी अथक प्रयत्न केले.