अवैध जनावर तस्कराच्या भरधाव वाहनाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले :प्रकाश मेश्राम यांचा घटना स्थळीच दुर्देवी मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध जनावर तस्कराच्या भरधाव वाहनाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले :प्रकाश मेश्राम यांचा घटना स्थळीच दुर्देवी मृत्यू

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

अवैध जनावरांची तस्करी करणाऱ्या ट्रक ने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर गाडी चढवून फरकटत नेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी रात्री पाऊणे 11 च्या दरम्यान वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत खांबाडा चेक पोस्ट वर घडली. प्रकाश मेश्राम असे या शाहिद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून वृत्त लिहेपर्यंत शव उत्तरीय तपासनीस पाठवण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी वरोरा पोलिसांना जनावरांनी भरलेली वाहन क्रमांक एम. एच. 49 एम 0614 या ट्रक वरोरा हद्दीतून पुढे येत असल्याची माहित मिळतच, खांबाडा चेक पोस्ट वर तैनात कर्मचारी प्रकाश मेश्राम यांना वायरलेस ने देण्यात आली .मेश्राम यांनी सतर्कता दाखवून सदर क्रमांकाचा ट्रक समोरून येत बघताच गाडी थांबविण्याकरिता इशारा देत पोस्ट च्या समोर थांबा घेताच समोरून भरधाव येणाऱ्या गाडीने त्यांना फरकटत नेऊन जागीच ठार केले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरु आहे. परंतु एका कर्त्यव्यनिष्ठ कर्मचाऱ्याला पोलीस प्रशासनाला मुकावे लागले.

काही महिन्यापूर्वीच चंद्रपूर जिल्यातील नागभीड पोलीस स्टेशन चे अधिकारी शाहिद छत्रपती चिडे यांना अवैध दारू तस्करांनी अश्याच रित्या चिरडले होते व त्यांचाही जागीच मृत्यू झाला होता. परत याच घटनेची पुनरावृत्ती घडल्याने समाजाचे रक्षण करण्याऱ्या पोलीस विभागाच्या रक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे.