राजुरा तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा : राजुरा)
-भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७० वा वर्धापन दिनानिमित्य  आज विविध शासकीय - निमशासकीय कार्यालय, वन विभाग, पोलीस स्टेशन, वेकोलि बल्लारपूर क्षेत्र महाप्रबंधक मुख्यालय, शिक्षण संस्था व विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या प्रागंणात उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर (भा.प्र.सेवा) यांचे हस्ते पार पडला.
या वेळी प्रामुख्याने आमदार संजय धोटे, माजी आमदार वामनराव चटप, सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल, तहसिलदार डॉ. रविंद्र होळी, वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, वन विभागाचे एस.एन. बासनवार, पोलीस निरीक्षक बाळू गायगोले, सुनील देशपांडे, अनिल ठाकूरवार, डॉ. अशोक जाधव, डॉ. सुरेश उपगन्लावर, एड. अरुण धोटे, अशोक देशपांडे, गजानन भटारकर, हरजीत सिंग, हेमंत झाडे, अनिल दुबे, अनेक राजकीय पक्षाचे नेते, शासकीय, निम शासकीय अधिकारी व कर्मचारी, पत्रकार प्रा.बी.यु. बोर्डेवार, कृष्णकुमार, सागर भटपल्लीवार,  व्यापारी, सर्व शाळेचे शिक्षकवृंद व हजारोंच्या संख्येने उपस्थित विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सकाळी ९.१५ वाजता पार पडला

यावेळी यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात आदिवासी ढेमसा नृत्याने सर्वांची मने मोहित केली. 

वेकोलि बल्लारपूर क्षेत्र मुख्यमहाप्रबंधक कार्यालयात मुख्यमहाप्रबंधक बी.सी. सिंग, सास्ती उपक्षेत्र येथे उपक्षेत्रीय व्यवस्थापक जी.के. कोडियार यांच्या हस्ते  ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

वन परिक्षेत्र कार्यालय येथे उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, एस.एन. बासनवार, वडेट्टीवार, सामाजिक वनिकरण चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

पंचायत समिती येथे उपसभापती मुमताज जावेद अब्दुल यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश गुरुनुले, माणूसमारे, गट विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, विस्तार अधिकारी अमित महाजनवार, मिलिंद कुळसंगे, गट शिक्षण अधिकारी भिवगडे, महिला व बाळ कल्याण अधिकारी सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत पार पडला या नंतर पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव जेणेकर यांचे आज दुःखद निधन झाले त्याप्रित्यर्थ पंचायत समितीच्या सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यमान सभापती कुंदा जेणेकर यांचे ते सासरे होय हे येथे विशेष. 

नगर परिषद येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. 
उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सर्व समितीचे सभापती व नगरसेवक, मुख्याधिकारी अर्शिया जुही, विजय जांभुळकर यांच्या उपस्थित पार पडला यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी व असंख्य नागरिक उपस्थित होते.
या नंतर नगर परिषदेमध्ये नागरिकांच्या सेवेकरिता टेलिफोनिक नागरी सहायता सेवा केंद्र (कॉल सेण्टर) चे उदघाटन एड. आमदार संजय धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. 

🔶पोलीस स्टेशन राजुरा येथे पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांचे हस्ते, 🔶वाय. डी. कॉलेज येथे आमदार एड. संजय धोटे, 

🔶शिवाजी कॉलेज येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दिलीप नलगे यांचे हस्ते, 
🔶इन्फन्ट जिसस कॉन्व्हेंट मध्ये नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते,
🔶 आदर्श हायस्कुल येथे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे यांच्या हस्ते, 
🔶आशादेवी मराठी प्राथमिक विद्या मंदिर मध्ये संस्थेचे सचिव भास्कर येसेकर यांचे हस्ते, 
🔶ब्रिलियंट कॉन्व्हेंट रामपूर येथे संस्थाध्यक्ष रवींद्र खैरे यांचे हस्ते,           
🔶नॅशनल पब्लिक स्कुल बामणवाडा येथे संस्थाध्यक्ष महेमूद मुसा यांचे हस्ते,          
🔶महर्षी इंग्लिश स्कुल बामणवाडा येथे संस्थाध्यक्ष प्रशांत माणूसमारे,    🔶स्टार किडस पब्लिक स्कुल रामपूर येथे संस्थेची सचिव लता काटवले यांच्या हस्ते तर मुख्याध्यापिका कविता वाघमारे व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
🔶आझाद चौक येथे नगरसेवक आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, उद्योजक राधेश्याम अडाणिया यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी नगरसेविका प्रिती रेकलवार, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, सुभाष रामगिरवार, प्रमोद बेतावार, सागर राचर्लावार, गणेश रेकलवार, राजू साईनवार, राजू बंदाली, हुसेन भाई, शैलेश गंपावार, गोपिका अडाणिया, अभि गंपावार, राकेश कर्णेवार, कदीर भाई व भारत चौकातील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.