शिवसेनेची गोंडपिपरी कार्यकारणी बरखास्त :मिथुन खोपडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेनेची गोंडपिपरी कार्यकारणी बरखास्त :मिथुन खोपडे

Share This



आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्ष्यात घेता शिवसेनेने विदर्भात नवीन संघटन व मोर्चेबांधणी सुरु केली असून. याच पार्शवभूमीवर अनेक निष्क्रिय कार्यकर्त्यांची पक्ष्याने हकालपट्टी करत युवा व संघटक कार्यकर्त्याना वाव देत अनेक फेरबदल करण्याचे निर्देश शिवसेनेचे विदर्भ संपर्क नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिले आहेत. 
 
 याचीच अंमलबजावणी करत आमदार बाळू धानोरकर यांच्या सूचनेनुसार राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख मिथुन खोपडे यांनी अनेक फेरबदल करत गोंडपिपरी कार्यकारणी बरखास्त केली असून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यानवीन दृष्टीने लवकरच नवीन कार्यकारणी गठीत करण्यात येईल.
तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रातही अनेक फेरबदल होणार असल्याची सूचना त्यांनी दिली.