रेंजर कॉलेज चंद्रपूर येथील वन अकादमीच्या बांधकामातीला अपघातात मजुराला गंभीर दुखापत : कंत्राटदाराचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रेंजर कॉलेज चंद्रपूर येथील वन अकादमीच्या बांधकामातीला अपघातात मजुराला गंभीर दुखापत : कंत्राटदाराचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Share This
 चंद्रपूर येथे मूल रोड स्थित रेंजर कॉलेज येथे वन अकादमीचे पालकमंत्री ड्रीम प्रोजेक्ट चे बांधकाम जोमाने सुरु आहे. सदर बांधकामाचे कंत्राट सुपर कन्स्ट्रक्शन प्रा.लिमिटेड कडे असून त्याकरिता कंत्राटदाराने बाहेर राज्यातील अनेक बांधकाम मजुरांकरवी काम करून घेत आहेत.याच बांधकामात  काल 15जानेवारी रोजी अपघात होऊन मजूर मदु दसरु यादव रा. कोटेबेन. तालुका छटखदान, जिल्हा राजनांदगाव या परप्रांतीय मजुराचा काम करत असताना 25फूट वरून खाली पडून अपघात झाला.
अपघात इतका गंभीर होता की त्याच्या डोक्याच्या हेल्मेट चे सुद्धा अनेक चिपोरे उडाले व डोक्याला जबर दुखापत झाली.
जखमी मजुराला त्याच्या इतर मजूर सहकार्यांनी  मेहरा हॉस्पिटल येथे भरती केले तेव्हा डॉ मेहरा यांनी महागडा खर्च सांगितल्यावर त्याला नाईलाजास्तव गव्हर्नमेंट हॉस्पिटल नागपूर येथे पाठविण्यात आले. या सर्व घटना क्रमाची कंत्राटदाराला माहिती दिल्यावरही कंत्रादाराकडून किंवा कॉलेज व्यवस्थापकाकडून कोणतीही विचारपूसही करण्यात आली नसल्याचे इतर मजुरांनी सांगितले. घडलेल्या सदर प्रकारची चौकशी सहाय्यक संचालक वन महाविद्यालय श्री खाडे साहेबांकडे केली असता त्यांनी मजुराला नागपूर ला हलविले असून एवढे सांगत बाकी बोलण्यास नकार दिला. कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगत टाळण्याचा प्रयत्न केला.
मजुरांच्या सुरक्षा मापदंडांच्या व  अपघात विम्या बद्दल विचारल्यास. कोणताही विमा नसल्याचे सांगत  जबादारीस टाळाटाळ केली.जखमी मजूर हा परप्रांतीय असून कोणत्याही कामगार संघटनेचा सदस्य नाही शिवाय जबर दुखापत होऊनही ना कंत्राटदार ना वन महाविद्यालय कुणीही जबादारी घेत त्याचा वैद्यकीय खर्च किंवा उघड्यावर पडलेल्या कुटुंबाची जबाबदारी कोन घेणार यावर  प्रश्न चिन्ह आहे. घटनेची खबर मजुरांकडून मिळताच चंद्रपूर येथील  माजी नगरसेवक बंडू हजारें यांनी घटना स्थळाला भेट देऊन मजुराच्या कुटुंबाच्या व्यथा एकूण घेत कॉलेज प्रशासनाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने कामगार आयुक्तांकडे तक्रार करत तातडीने मदत न मिळाल्यास सर्व मुजारांकरवी आंदोलन करून काम बंद पडण्याचा इशारा दिला आहे.