राजुरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र चे छप्पर कोसळले:एक जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र चे छप्पर कोसळले:एक जखमी

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा शाखेचे छप्पर कोसळून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सविस्तर वृत्त असे की सदर शाखेतील खातेधारक संतोष मारोती देवाळकर, वय 33वर्षे, रा. गोवारी हे वैयक्तिक खात्यात व्यवहार करण्यास गेले असता बँकेचा दुपारच्या विश्रांतीचा वेळ झाल्यामुळे इतर खातेदारांसह शाखेतच उभे होते.अचानक वरील छप्पराचे सिमेंट काँक्रीट हे पीओपी केलेल्या भागावर कोसळून संपूर्ण काँक्रीट चा लगदा व पीओपी चे भाग त्यांच्या डोकयावर कोसळले.त्यांच्या डोक्याला जबर मार बसला असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे हलविण्यात आले.  दैव बत्तलवर म्हणून मोठी दुर्घटना टळली. सदर घटनेवेळी शाखेत कर्मचाऱ्यांसहित 40-50 लोक उपस्थित होते.
               


 शाखा व्यवस्थापकाची उद्धट वागणूक
 देवाळकर यांना जखमी बघून इतर खातेदार मदतीला धावून गेले. परंतु शाखा व्यवस्थापक राकेश चौबे यांनी उपस्थितांना उद्धट वागणूक देत बाहेर हाकलून लावले व दार बंद करत देवाळकर यांना तिथेच ताटकळत ठेवले. सर्व खातेदारांनी जमाव करत यांचा निषेध व्यक्त करत देवाळकर यांना बाहेर काढा मागणी करत असताना शाखेत चोरी होऊ शकते असे कारण सांगत दार उघण्यास मज्जाव केला. यावेळी अनिरुद्ध मेश्राम नामक वेकोलि कर्मचाऱ्यानी देवाळकर यांना बाहेर काढत   स्वतःच्या दुचाकीने रुग्णालयात पोहोचवले. तरीही व्यवस्थापक व कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मदतीचा हाथ पुढे केला नाही उलट पक्षी शाखेत काही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस रिपोर्ट करण्याची धमकी दिली. याचे सर्व ग्राहकाकडून व घटनेची माहिती घेण्यास गेलेल्या पत्रकार बांधवाकडून रोष व्यक्त होत आहे. 

सदर इमारत ही नगरपरिषदेच्या मालकीची असल्यामुळे,घटना कळताच राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. इमारतीच्या वरच्या भागात मंडप डेकोरेशन च्या कामाकरिता वरचा मजला भाड्याने दिलेला असून सुपर मार्केट येथील  सार्वजनिक  कार्यक्रमाच्या वेळेस स्वयंपाक खोली म्हणून या भागाचा उपयोग होतो. त्यामुळे सततची उचल दडप व गॅस शेगडी च्या वापरामुळे जागा गरम होऊन सदर घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.