लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे आधी विकासकामे संपवा :नितीन गडकरी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे आधी विकासकामे संपवा :नितीन गडकरी

Share Thisनागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ आलेले असून तत्पूर्वीच  येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्ष्यात घेता 15 फेब्रुवारी पर्यंत कामे आटोपत घेण्याचा आदेश देत बैठकांचा सपाटा सुरु केला आहे.  
नागपुरातील केळीबाग-जुना भंडारा रस्ता सहा पदरी करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत निविदा काढण्याचे निर्देश दिले. पारडी उड्डाण पुलाचे जमीन संपादन 25 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना गडकरींनी केली.
त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पूल तोडून तेथील दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय यशवंत स्टेडियमची पुनर्बांधणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक, बुधवार बाजारचे डिझाइन आदी कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत.