पंचायत समितीचे माजी सभापती मारोती जेनेकर अनंतात विलीन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पंचायत समितीचे माजी सभापती मारोती जेनेकर अनंतात विलीन

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर (दीपक शर्मा / राजुरा):

काँग्रेसचे जेष्ठ नेते, राजुरा पंचायत समितीचे माजी सभापती मारोती गोसाई जेनेकर यांचे २६ जानेवारीला पहाटे हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७६ वर्षाचे होते. त्यांचेमागे तिन मुले, स्नुषा, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे. राजुरा पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ.कुंदा जेनेकर यांचे ते सासरे होते.  

                         

धानोरा येथील त्यांचे मुळ गावी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार एड. संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे, एड. वामनराव चटप, सुरर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, दादा पाटील लांडे, अविनाश जाधव, दिलीप नलगे, खुशाल बोन्डे, प्रशांत घरोट, गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, गट विकास शिक्षण अधिकारी भिवगडे, किरण सूर्यवंशी, डॉ. अशोक जाधव, हेमंत झाडे, बापू धोटे, नारायण रेड्डी सह चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिली. 

दानशूर व्यक्तिमत्व व दिन दुबळ्यांच्या सहायतार्थ नेहमी धावून जाण्यास तत्पर अशी ओळख असलेले मारोती जेनेकर यांनी १९९९ ते २००२ पर्यंत पंचायत समितीचे सभापती पद भूषविले त्यांच्याच काळात शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना वाहनांची सोय करून दिली होती हे येथे विशेष.