औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) व जेसीआय राजुरा प्राईड च्या वतीने शहरात मतदार जनजागृती रॅली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) व जेसीआय राजुरा प्राईड च्या वतीने शहरात मतदार जनजागृती रॅली

Share This
-खबरकट्टा / चंद्रपूर (दीपक शर्मा :राजुरा )
देशात मतदार जागरूकता दिवस प्रत्येक वर्षी 25जानेवारीला साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठी  लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशात जनमानसाचा मतदानाकडे कमी होत असेलला कौले बघता राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो.

आज राजुरा शहरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) व जेसीआय राजुरा प्राईड च्या वतीने शहरात मतदार जनजागृती रॅली इंदिरा नगर परिसरातून काढण्यात आली.

ज्यात प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश देत जनजागृती केली. मतदानाच्या दिवशी "सर्व कामे सोडा - आधी मतदान करा " अशा फलकातून सूचक संदेश देत "जन जन को यही पुकार, अपना वोट न जाये बेकार " असे नारे देत मतदारांना जागृत केले.सोबतच संस्थेचे प्राध्यापक व जे सी आय च्या सदस्यांनी मतदानाचे महत्व समजावून सांगत मतदारांना प्रेरित  केले.

रॅली प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य वैभव बोनगिरवार यांच्या मार्गदर्शनात गट निर्देशक अविनाश अर्जुने, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी अभय घटे, विजय वानखेडे, सर्व प्राध्यापक वृंद तसेच जेसीआय चे माजी अध्यक्ष व्यंकटेश गड्डम, गोपाल सारडा, विशाल शर्मा, शारदा गड्डम, चंदा ओझा, संगीता पाचघरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. सोबत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.