गावातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे कार्य सरकारच्या माध्यमातून करणार -- आमदार अँड संजय धोटे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गावातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे कार्य सरकारच्या माध्यमातून करणार -- आमदार अँड संजय धोटे

Share This
-पांढरपौनी येथे ४९ लक्ष रुपयांचा विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
खबरकट्टा / चंद्रपूर :

गावातील मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो रस्ते,नाली,आरोग्य, पिण्याचे पाणी, विज या समस्या सर्वांसाठी अग्रहित असतात या उद्देशाने आपल्या गावातील समस्या सोडविण्याचे आम्ही पुरेपूर पर्यत करत असल्याचे आमदार अँड संजय धोटे यांनी सांगितले राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथे आमदार अँड संजय धोटे यांचा प्रयत्नाने ४९ लक्ष रुपयांचा विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

प्रत्येक नागरिक गावातील समस्या घेऊन आमच्या पर्यत येतो त्या नागरिकांची समस्या सोडविणे आमचा अधिकार आहे.
आपण मला आपला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले त्या करिता मी पूर्ण पणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
                         

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, पंचायत समिती सदस्य सौ सुनंदा डोंगे,नगर सेविका सौ उज्वला जयपूरकर,नगर सेविका सौ प्रिती रेकलवार, माजी सरपंच पांडुरंग चन्ने,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,पोलीस पाटील निता खणके,सौ ममता केशेटीवार,संजय जयपूरकर,सुरेश धोटे, संजय उपगनलावार, सत्यपाल आत्राम,विनोद हेपट, सुरेखा बोरकुटे,संदीप गायकवाड,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, प्रकाश पाटणकर,बाबुराव लोखंडे, विठोबा बोबडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार संजय धोटे म्हणाले की गावातील काही नागरिकांनी अनेक वेळा माझ्या कडे रस्त्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने आज पूर्ण झाली असून त्या बद्दल मी आज समाधानी आहे.
नागरिकांनी गावातील आदिवासी बांधवांसाठी समाज भवनाची व रस्त्याची मागणी केली आहे ते सुद्धा पूर्ण करणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून हरीश शर्मा  यांनी  आपल्या भाषण प्रसंगी बोलताना म्हणाले आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक विकासाचे कामे झाले आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने कोट्यावधीचा निधी या क्षेत्रात मिळाला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले
कार्यक्रमा प्रसंगी गावातील महिलांनी मकरसंक्रांत निमित्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप गायकवाड यांनी केले,सुत्रसंचालन आशिष ताजने यांनी तर आभार प्रदर्शन विनोद हेपट यांनी केले यावेळी गावातील नागरिक मोठया संख्येने सहभागी होते.