राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रपीता महात्मा गांधींना अभिवादन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रपीता महात्मा गांधींना अभिवादन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : (राजुरा/दिपक शर्मा) :
आज दिनांक ३० जानेवारी २०१९ रोज बुधवारला सकाळी ठिक ११ वाजता राजुरा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचे संपर्क कार्यालय हाँटेल प्रदिप येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, कार्याध्यक्ष नंदु वाढई, खजिनदार अशोकराव देशपांडे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संतोष गटलेवार, जिल्हा समन्वयक अर्चना गरगेलवार, सुमित्रा कुचनकर, साबीर सय्यद, अध्यक्ष साहिल सोळंके,संदेश करमरकर, युवराज ठाकूर, बाबाजी वडस्कर, महासचिव आकाश मावलीकर, मारोती आईलवार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

.