'बाळू' ची वाटचाल कुपोषितग्रस्त मेळघाट कडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

'बाळू' ची वाटचाल कुपोषितग्रस्त मेळघाट कडे

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर :(दीपक शर्मा / राजुरा):
अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांचा मिळून मेळघाट विभाग बनला आहे. सातपुडा पर्वताच्या सात रांगा या भागात एकत्र येत असल्याने याला मेळघाट म्हटले जाते. या दोन तालुक्याची लोकसंख्या तीन लाख आहे. मेळघाट दुर्गम डोंगरी भाग असून येथील ९० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. यातही कोरकू जमात ७५ टक्के आहे. रस्ते, वाहतूक व दळणवळणाच्या साधनांचा अभाव आहे. बहुतेक आदिवासी शेतमजूर किंवा अल्पभूधारक आहेत. सिंचनाचे प्रमाण अत्यल्प असल्याने केवळ पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. उत्पन्नाची साधने कमी असल्याने गरिबीचे प्रमाण अधिक आहे. म्हणून बहुतांश लोक पावसाळ्यानंतर कामासाठी मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या इतर भागात जातात. त्याचा अनिष्ट परिणाम त्यांचे कुटुंब व मुलांवर होतो. व त्याचे रूपांतर लहान बालकांचा जीवनावर पडतो त्यामुळे कुपोषण वाढीस लागतो. 

राजुरा तालुक्यात काम करणारी 'बाळू' बी ए पार्ट ऑफ लविंग युनिट ने मेळघाट ला कुपोषण मुक्त करण्याकरिता प्रयत्न करणे सुरू केले आहे. 


'बाळू' च्या माध्यमाने आता राजुरा तालुक्यात वाढदिवसाला कुपोषित बालकाला १ वर्षाचा पोषण आहार देऊन दत्तक घेण्याची चळवळ सुरू आहे. अंगणवाडी सेविकेचा देखरेखीखाली त्या कुपोषित बालकाला सुपोषित करण्यात राजुरा तालुक्याला आता यश प्राप्त झाले असून आता पर्यंत 'बाळू' च्या माध्यमातून जवळपास १२५ बालकांना पोषण आहाराची भेट वाढदिवसाच्या निमित्याने जनसहकार्यातून करण्यात आली आहे. सोमवार ला जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेचे प्रवीण लांडे यांच्या वाढदिवस चुनाळा येथील अनाथ अनाथाश्रलाय व गौशाळा येथे साजरा करण्यात आला तिथे प्रवीण लांडे यांनी मेळघाट मधील दोन बालकांना दत्तक घेण्याच्या संकल्प करून कुपोषित बालकाच्या पोषण आहारा करिता 'बाळू' ला दोन हजार रुपयाची मदत दिली व भविष्यात 'जीवनदीप' चे पदाधिकारी व सदस्य अश्याच प्रकारे कुपोषित बालकाला वर्षभराचा पोषण आहार देऊन वाढदिवस साजरा करतील याची ग्वाही दिली. 


यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व बाळूचे अमित महाजनवार, दीपक शर्मा, सागर भटपल्लीवार, अमोल ताठे, अनिल पुरटकर, प्रवीण चे वडील गजानन लांडे, पत्नी प्रनिता लांडे, भाऊ महेश लांडे, जीवनदिप संस्थेचे संदिप आदे, रत्नाकर पचारे, प्रविण दुरबडे, तुषार खोके, विजय पचारे, अमर पचारे, सुजित कावळे, विजय माने, परिमल बोबडे, विकी पायपरे, संदिप धामनगावकर, सुरज सोमलकर, गणेश मोहुर्ले, स्वप्निल कोंडावार, छबन पचारे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.