राजुरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे स्वच्छता अभियान :संपर्क प्रमुख मिथुन खोपडे यांनी केली संपूर्ण कार्यकारणी बरखास्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे स्वच्छता अभियान :संपर्क प्रमुख मिथुन खोपडे यांनी केली संपूर्ण कार्यकारणी बरखास्त

Share This
खबरकट्टा :चंद्रपूर


राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले असून जवळपास सर्वच प्रमुख पक्षानी अनेक प्रवेश, फेरबदल, बूथ उभारणी पासून ते जिल्हा प्रमुखपर्यंत पदांच्या कार्यभाराची चाचपणी सुरु केली आहे. नजीकच्या काळातील निवडणुकीचे मापदंड लक्षात घेता शिवसेनेही कार्यकर्त्यांची जोमाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.कार्यकर्त्यांची जुनी -नवीन फळी एकत्रित करून संघटन मजबूत करून पक्ष वाढीकरिता निष्क्रिय कार्यकर्त्यांची सुट्टी करत व नवीन संघटक कार्यकर्त्याना वाव देण्याकरिता शिवसेनेचे राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख मिथुन खोपडे यांनी  विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शन व आमदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या सूचनेने राजुरा विधानसभेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त केली आहे.

यात राजुरा, कोरपना, गडचांदूर ,गोंडपिपरी, जिवती कार्यकारणी च्या सर्व तालुका, शहर प्रमुखांचा समावेश असून पक्ष बळकटीकरणासाठी सर्वच पदांवर लवकरच सक्षम नेमणूका होईल जेणेकरून पक्षाचे कार्य जनमाणसात पोहचवले जाण्यास मदत होईल असे खोपडे यांनी आज राजुरा येथे घेतलेल्या बरखास्त बैठकीत सांगितले. सदर बैठकीला विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख तथा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन कार्यकारणीत कुणाची वर्णी लागणार याबद्दल सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.