जिल्ह्यात नरभक्षी वाघाची दहशत कायम :राजुरा वन परिसरात महिलेचा बळी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात नरभक्षी वाघाची दहशत कायम :राजुरा वन परिसरात महिलेचा बळी

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर  : नरभक्षी वाघाची दहशत सतत वाढत असून संपूर्ण चंद्रपूर जिल्हाभर दररोज नरबळींचे थैमान सुरूच आहे.
अशीच आणखी एक घटना राजुरा वन परिसरात खांबाडा गावानजीक  घडली. गावातील वर्षा सत्यपाल तोडासे ,वय 39  दुपारी दोन  च्या दरम्यान  सरपणासाठी गावालगतच्या जंगल परिसरात गेली असता पट्टेदार वाघाने हमला करत जागीच ठार केले.


राजुरा वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 177 मध्ये दुपारी खांबाला गावातील महिला झाडू गवत कापण्यासाठी गेले असता डबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला करीत वर्षा सत्यपाल तोडासे हिला जागीच ठार केले  यावेळी उपस्थित तिची सासू,भाऊंनी आरडा ओरड करून वाघाला हाकलून लावले.
         
              घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रवींद्र होळी,उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल ,विरुर चे ठाणेदार अरविंद कटलाम, वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगत,बासंणवार, घटनास्थळी पोह्चलेत, यावेळी मृतकाचे नातेवाईकांनी नोकरी आणि पैश्याची मागणी करीत मृत्यूदेह हलविण्यास नकार दिला असून गावातील लोकात भीती तथा तणावाची स्थिती निर्माण झाली होती.