करणी सेना लक्षात ठेवा "मी सुद्धा एक राजपूत आहे " :कंगना चे झांसी राणी स्टाईल प्रतिउत्तर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

करणी सेना लक्षात ठेवा "मी सुद्धा एक राजपूत आहे " :कंगना चे झांसी राणी स्टाईल प्रतिउत्तर

Share This
मुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने कंगना राणावतनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


महाराष्ट्रातील करणी सेनेने 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवण्यात यावा, अशी मागणी करणी सेनेने केली आहे. या सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांचे एका ब्रिटीश अधिकाऱ्यासोबत संबंध दाखवण्यात आल्याच्या काही बातम्या आल्यानंतर करणी सेनेने या सिनेमाला विरोध सुरु केला आहे.
मणिकर्णिका या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई साकारणाऱ्या कंगना राणावतने करणी सेनेची मागणी धुडकावून लावली आहे. कंगना म्हणाली, की करणी सेनेने त्रास द्यायचे थांबिवले नाही, तर मी पण राजपूत आहे. सर्वांना उद्ध्वस्त करेन.
'मणिकर्णिका  : द क्वीन ऑफ झाँसी' हा सिनेमा चार इतिहासकारांनी प्रमाणित केल्याची माहिती कंगनाने दिली आहे. सेन्सॉर बोर्डाकडूनही या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. शिवाय करणी सेनेलाही कळवण्यात आले होते. तरीही करणी सेनेने मला किंवा या सिनेमाशी संबंधित कोणालाही त्रास देणे थांबवले नाही, तर मी एकएकांना उद्ध्वस्त करेन.