चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू

Share This


मूल तालुक्यातील येरेगाव येथे राहणारे मारुती पुठावार हे मेंढपाळाचे काम करत होते.          चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात आठवडाभरात तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून मंगळवारी मूल तालुक्यात एका मेंढपाळाला वाघाच्या हल्ल्यात प्राण गमवावा लागला.
मूल तालुक्यातील येरेगाव येथे राहणारे मारुती पुठावार हे मेंढपाळाचे काम करत होते. मंगळवारी दुपारी गावातील जंगलात मारुती पुठावार यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची तिसरी घटना
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही आठवडाभरातील तिसरी घटना आहे. शनिवारी दक्षिण ब्रह्मपुरी वनपरीक्षेत्राअंतर्गत हडदा येथे वाघाने गुराख्यावर हल्ला केला होता. यात दिवाकर गेडाम असे या गुराख्याचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी ९ जानेवारी रोजी जंगलात चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. राजू नागेश्वर गुजलवार (३५) असे या तरुणाचे नाव होते. लोहारा गावात राहणारा राजू हा चारा आणण्यासाठी जंगलात गेला होता.