भाजपा विरोधकांना देणार त्यांच्याच भाषेत उत्तर : पंकज शुक्ला - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजपा विरोधकांना देणार त्यांच्याच भाषेत उत्तर : पंकज शुक्ला

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

भारतीय जनता पार्टी (भाजपा) आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल.

आता वेळ आली आहे की, आपण केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामांच्या आधारावर  मते मागायला हवीत

आमचा दावा आहे की आजपर्यँत इतकी विकास कामे कोणत्याही सरकार ने केली नाहीत.


वरील विचार भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया व आयटी सेल च्या एक दिवशीय कार्यशाळेत प्रदेश प्रभारी पंकज शुक्ला यांनी व्यक्त केले. काल महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया विभागाची मुंबई येथे वसंत स्मृती कार्यालयात महत्वाची बैठक झाली. या बैठकीला ट्विटर या सोशल मीडिया साईटबद्दल ट्विटरच्या अधिकारी पायल कामत यांनी संबोधित केले व ट्विटरच्या शंकांचे निरसन केले.


त्यानंतर महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आमदार अतुल भातखळकरजी यांनी सर्व सोशल मीडिया वारीयर्सना २०१९ च्या निवडणुकीसंदर्भात सोशल मीडियाचा रोल तथा २०१९  च्या निवडणुकीसंदर्भात सोशल मीडियाचा रोल तथा काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.


 सोशल मीडिया राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व गुजरात सोशल मीडियाचे संयोजक पंकज शुक्ला यांनी सोशल मीडियाबाबत महत्वाची माहिती घेऊन महाराष्ट्र सोशल मीडियाचा संपूर्ण आढावा घेतला.  मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार  व संघटनमंत्री सुनीलजी कर्जतकर यांचे मार्गदर्शन केले.  आशिष शेलार यांनी विरोधकांच्या अपप्रचाराला आक्रमकपणे उत्तर द्या, असे सांगत महाराष्ट्र सोशल मीडिया टीमचे कौतुक केले.दादर स्थित वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या या बैठकीला भाजपचे प्रदेश महासचिव अतुल भातखालकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेश अध्यक्ष आशिष मेरखेड यांनी बठकीला उपस्थित सर्व जिल्हा पदाधिकारी व लोकसभा प्रभारी यांना मार्गदर्शन केले.बैठकीचे सूत्र संचालन अधिवक्ता महेश शर्मा यांनी केले.बैठकीला सोशल मीडिया कार्यालय सन्मवयक अंकित कुलकर्णी सहित महाराष्ट्रातील 48 लोकसभा व सोशल  मीडिया प्रभारी व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.