शरीराला द्या सहज समाधी ध्यान : रहा तणावमुक्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शरीराला द्या सहज समाधी ध्यान : रहा तणावमुक्त

Share This
प्रत्येकाने खूप आनंदाच्या क्षणी तसेच एखाद्या कामात पूर्ण बुडून गेलेले असताना असा अनुभव घेतला असेल की ध्यानाचा एक क्षण असा येतो जेंव्हा मन खूप हलके आणि तरल होते. आपण जरी असे क्षण अनुभवले असेल तरी आपण आपल्या इच्छेने तो पुन्हा पुन्हा अनुभवू शकत नाही. सहज समाधी ध्यान तुम्हाला तो अनुभव पुन्हा पुन्हा कसा मिळवावा हे शिकवतो. सहज समाधी ध्यान मध्ये सहभागी होणाऱ्याला तणावापासून तत्काळ मुक्ती मिळते, मन खोलवर मोकळे होते आणि सर्व शरीराला पुनर्नवे करते.

'सहज' एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ नैसर्गिक किंवा सुलभ असा आहे. 'समाधी' ही एक खूप खोलवर अशी प्रसन्न ध्यानाची स्थिती आहे. 'सहज समाधी ध्यान 'म्हणजे ध्यानाची नैसर्गिक सुलभ प्रक्रिया होय.

हे ध्यान सतत केल्याने शांती, ऊर्जा आणि दिवसभर टिकणारी सजगता निर्माण होऊन आयुष्याची गुणवत्ता सुधारते. योगाबरोबर हे ध्यान केल्याने उत्तम आरोग्य आणि शांत मनाचा लाभ होतो.

- जागृत / सचेतन  मन आत्म्यात विलीन होते व गहन विश्रांतीचा अनुभव येतो.

- जेव्हा मन शांत होते तेव्हा सर्व तणाव निघून जातात आणि मग एकाग्रता वाढून तुम्ही आरोग्यपूर्ण होता.


सहज समाधी ध्यान कसे काम करते?
यात  मनात एक साध्या-सोप्या ध्वनीच्या (मंत्र) उच्चाराद्वारे मन शांत करण्यात येते . जेव्हा मनाला आणि मज्जा-संस्थेला काही क्षण गहन विश्रांती मिळते तेंव्हा आपल्या प्रगतीला अडसर ठरणाऱ्या सर्व गोष्टी हळूहळू विरघळून जातात.

मनःशांती ही रोजच्या आयुष्यात कशी उपयोगी पडते?
जेव्हा नदी शांत असते तेव्हा त्यातील प्रतिबिंब हे स्पष्ट दिसते. जेव्हा मन शांत असते तेव्हा अभिव्यक्तीमध्ये जास्त सुस्पष्टपणा येतो. आपल्यात निरीक्षण, आकलन आणि अभिव्यक्ती यांची शक्ती वाढते. यामुळे आपण इतरांशी जास्त प्रभावीपणे आणि स्पष्टपणे संवाद साधू शकतो.

मला मंत्राची का आवश्यकता आहे?
संस्कृतमध्ये मंत्राचे वर्णन केले आहे की, “मनना त्रायते इति मंत्रः”- म्हणजे जे तुम्हाला पुनरावृत्तीपासून वाचवते ते. विचारांची पुनरावृत्ती म्हणजेच चिंता.मंत्र तुम्हाला चिंतामुक्त ठेवतो.