सुभाषभाऊ धोटे यांच्या कार्याची दिल्ली दरबारी दखल : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी केली कॉँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी निवड. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सुभाषभाऊ धोटे यांच्या कार्याची दिल्ली दरबारी दखल : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी केली कॉँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी निवड.

Share This
-चंद्रपूर जिल्हाला आता मिळणार नवचेतना. 
सर्वत्र अभिनंदनाचा वर्षांव, आणि आनंदाचे वातावरण. 

  
खबरकट्टा/ चंद्रपूर :

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी दिनांक २३ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून अ. भा. रा. काँ. चे केंद्रीय प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातील एकुण १३ जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती त्यांनी केली आहे. त्यात राजुरा विधानसभा काँग्रेसचे कर्नधार असलेले प्रचंड मेहनत आणि पक्षनिष्ठा बाळगून काम करणारे लोकप्रिय नेते माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची दखल घेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. सुभाष धोटे हे माजी आमदार स्वर्गीय रामचंद्रराव धोटे यांचे पुत्र असून त्यांना बालपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी कायम धडपड सुरू ठेवली आहे. या भागातील लोकनेता अशी त्यांची ख्याती आहे. १९७१ मध्ये विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद स्विकारुन त्यांनी आपल्या नेतृत्वाला सुरूवात केली. १९७५ चंद्रपूर जिल्ह्याचे एनएसयूआयचे अध्यक्ष, १९७८ मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, १९७९ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरचे कृषी सभापती, जि. प. चे हंगामी अध्यक्ष, १९८६ मध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, १९९२ ते १९९३ व १९९७ ते १९९८ दोनदा राज्य सहकारी बँक ( शिखर बँक) नागपूर विभागचे अध्यक्ष, १९९५ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि २००९ मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१६ पासुन विदर्भ मार्केटिंग फेडरेशन नागपूरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी त्यांची थेट नाड जडलेली आहे. 

अशा या बहुआयामी नेत्याच्या निवडीबद्दल संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत नवीन ऊर्जा व जोश संचारला आहे. आपल्या लोकप्रिय नेत्याची राष्ट्रीय स्तरावरून दखल घेतली गेल्याने व महत्त्वाचे पद मिळाल्याने सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. तर अनेकांकडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर या निवडीबद्दल नवनियुक्त जिल्हाध्यक्षांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, प्रदेश प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे विधिमंडळ उपगटनेता तथा जिल्ह्याचे नेते विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.