मानवता हाच खरा धर्म:-आमदार अँड.संजय धोटे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मानवता हाच खरा धर्म:-आमदार अँड.संजय धोटे

Share This


वनसडी येथे विट्ठल रुखमाई मंदिर ट्रस्ट तर्फे सत्कार समारंभ संपन्न


आध्यात्मामुळे मनुष्याच्या मनाला शांती लाभते,तसेच देवाची उपासना केल्यामुळे समाजात सामाजिक सौंदार्याची भावना निर्माण होऊन एकोपा तयार व्हायला सुरुवात होते.
जगात मानवता हाच खरा धर्म असून जागतील सर्व मनुष्य जातिला एका सूत्रात बांधण्याचे काम मानवतेमुळे सुरु आहे असे गौरउद्गार वनसडी येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमा प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड.संजय धोटे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील वनसडी येथे गावकरी तसेच विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आमदार अँड संजय धोटे  यांचा जाहिर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय मुसळे यांचा सुद्धा सत्कार यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आला.
वनसडी परिसरातील जेष्ठ नागरिक,युवक,शेतकरी बांधव व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या  बचत गटांच्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
जेष्ठ नागरिक गटातून आनंदराव मालेकर,कवडु पाटील कुंभारे,उत्कृष्ट शेतकरी म्हणून संजय पिंपळशेंडे,हर्षल भोंगळे,युवक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य म्हणून आशिष ताजने,महिला बचत गट क्षेत्रातून प्रियांका पोटवडे,प्रीती धाकाते,लिलाबाई आस्वले,कौशल्या धाबेकर, सुशील गेडाम यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वनसडीचे जेष्ठ समाजसेवक नारायण पाटील कोल्हे होते.
त्यांनी प्रास्ताविक भाषणात विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे कार्याची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.
या कार्यक्रमकला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष रमेश पाटील मालेकर,भाजपाचे जेष्ठ नेते प्रल्हादजी पवार,प्रदीप पिंपळशेंडे, हितेश चव्हाण, कान्हाळगावचे सरपंच विनोद नवले,पिपरीचे सरपंच कवडु पाटील कुंभारे,माथाचे माजी सरपंच शशिकांत आडकीने, कोरपना शाखा प्रमुख अनिल कौरासे,वनसडी पोलीस पाटील संध्याताई करिये,गजानन भोंगळे,नैनेश आत्राम,अनिल चांदेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.